Maharashtrian Patwadi Recipe : सकाळच्या लगबगीत सर्व महिलांपुढं एकच टेंशन असतं. ते म्हणजे आज नवरा किंवा मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं? अनेकदा आदल्या दिवशी बाजारात गेलं नाही तर महिलांना ह्या कॅामन समस्येला सामोरं जावं लागत. मात्र, आज तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहोत जी झटपट तयार होते आणि खायला सुद्धा रुचकर असते.
पाटवडीबाबत तुम्हाला माहिती असेलच. ही अशी रेसिपी आहे जे घरी असलेल्या साहित्यात तुम्ही पटकन तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पाटवडी तयार करण्याची सोपी पद्धत.
- साहित्य
- हरभरा डाळीचं पीठ
- तेल
- मोहरी
- जिरे
- हिंग
- तिखट
- मीठ
- हिरवी मिरची
- लसूण
- खोबऱ्याचा किस
- कढीपत्ता
- कृती
- सर्वात आधी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि जिरं मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घ्या. चवीनुसार तिखट-मीठ आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिऱ्याची केलेली पेस्ट त्यात मिसळा.
- हे मिश्रण पाण्याने घट्ट भिजवून घ्या.
- आता कढई गरम करण्यासाठी गॅस फ्लेमवर ठेवा.
- तेल गरम झाल्यावर ते तयार केलेल्या मिश्रणामध्ये टाका.
- मिश्रणाला चांगल्या 3 ते 4 वाफा काढून घ्याव्यात.
- यानंतर एका ताटाला तेल लावून घ्या.
- मिश्रण घट्ट झाल्यानंतर ताटामध्ये काढा.
- वरील मिश्रण ताटावर थापून घ्या. वरून कोथिंबीर आणि खाबऱ्याचा किस टाकून घ्या.
- चाकुच्या सहाय्यानं थापलेलं मिश्रण वडीसारखं कापून घ्या.
- त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्याला जिरं आणि कढीपत्त्यानं फोडणी द्या. त्यांनतर यात पाणी घाला आणि दोन तीन उकड्या येवू द्या. त्यात ह्या वड्या घाला.
- झाली पाटवडी तयार.