Mutton Soup Recipe: थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, घसा आणि इतर संसर्गजन्य आजाराचा त्रास होतो. अशा परिस्थित शरीराला उबदार ठेवण्याकरिता पोष्टिक आहार महत्त्वाचा आहे. हिवाळ्याच्या गारव्यामुळे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही पाया सूप म्हणजेच मटणाचं सूप पिऊ शकता. पाया सूप पोटॅशियम, फायबर, सोडियम, लोह तसंच व्हिटॅमिन अ आणि क आदी पोषक घटकांनी समृद्ध आहे. तसंच या सूपमध्ये जिलेटिन हा पोषक घटक असतो. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसंच गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. त्याचबरोबर यात कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते. यामुळे हाडं निरोगी राहतात. विशेष म्हणजे हा सूप तुम्ही एकही थेंब तेल न घालता तयार करू शकता.
- साहित्य
- पाया 4 नग
- मिरपूड - 1 टेस्पून
- जिरे पावडर - 1 टीस्पून
- कढीपत्ता
- आलं लहान तुकडा
- लसूण पाकळ्या - 10
- लहान कांदा - 1 मूठभर
- टोमॅटो - 1/2
- हल्दी पावडर - 1/2 टीस्पून
- कोथिंबीर
- मीठ - आवश्यकतेनुसार
- पाणी - 2 लिटर
- पाया (मटण) सूप रेसिपी
- सर्व प्रथम मिरी, जिरे आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- आता यात आलं आणि लसून देखील बारीकर करून घ्या. या मिश्रणात कांदा बारीक कापून घ्या.
- नंतर टोमॅटो बारीक चिरून बाजूला ठेवा.
- आता कुकर घ्या. त्यात हळद आणि मीठ घालून धुतलेले पाया घाला. तसंच यात वरील मिश्रण घाला.
- आता यात दोन लिटर पाणी घाला आणि 10 ते 12 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या.
- शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा आणि चिरलेली कोथिंबीर घाला. तयार आहे तुमचा पाया सूप.
- पाया सूप पिण्याचे फायदे
- पाया सूप पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- सांधेदुखापूसन आराम मिळते.
- रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
- झोप चांगली येते.
- हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम.
- वजन कमी करण्यास मदत करते.
- त्वचा तसंच केसांसाठी फायदेशीर.
- हायड्रेटेड राहण्यासाठी उत्तम.
- सर्दीची लक्षणं कमी करण्यासाठी चांगलं.