ETV Bharat / health-and-lifestyle

वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे तपशील येथे जाणून घ्या... - benefits of sleep - BENEFITS OF SLEEP

Sleep According to Age : आजकालच्या व्यग्र जीवनात अनेकजण झोपेवर दुर्लक्ष करतात. मात्र झोप ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वयानुसार किती तास झोप घेतली पाहिजे, याबद्दल सांगणार आहोत.

Sleep According to Age
वयानुसार झोप ((फोटो - Getty Images))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 10:48 AM IST

मुंबई - Sleep According to Age : आपल्या शरीरासाठी अन्न, पाणी आणि श्वासोच्छ्वासही खूप महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे झोपही खूप महत्त्वाची आहे. जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. डॉक्टरांच्या मते, प्रत्येक व्यक्तीनं दररोज पुरेशी झोप घेतली पाहिजे, यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर आरोग्याबद्दल अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आता रोज किती झोप घ्यावी, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॉक्टरांच्या मते, एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप न मिळाल्यास त्याला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.

शरीरासाठी झोप आवश्यक : याशिवाय महिलांमध्ये कमी झोपेमुळे स्तनाच्या कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. कमी झोप घेतल्यानं शरीराच्या इतर पेशींवरही वाईट परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्यास शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडू लागतं, हाडंही हळूहळू कमकुवत होऊ लागतात. झोपताना आपलं शरीर विषारी पदार्थांपासून स्वच्छ होतं आणि स्वतःची दुरुस्ती करतं. जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा हृदयविकाराचा धोका वाढतो. नॅशनल स्लीप फाउंडेशननं प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी सुमारे 7-8 तास झोप घेतली पाहिजे. याशिवाय ते यापेक्षा थोडी कमी झोपू शकतात म्हणजेच 5 ते 6 तास देखील झोप घेऊ शकतात.

Sleep According to Age
वयानुसार झोप ((फोटो - Getty Images))

मोबाईलमुळे निद्रानाश : झोप वयानुसार घेतली पाहिजे. प्रौढांमध्ये झोपेची समस्या सामान्य आहे. आजकाल अनेकजण मोबाईलवर चित्रपट आणि काही कार्यक्रम पाहतात, तज्ञाच्या मते, आज निद्रानाश, कमी झोपेमागील सर्वात मोठं कारण म्हणजे मोबाईलवर जास्त वेळ राहल्यानं होतं. यामुळे, नैसर्गिक मेलाटोनिन प्रॉड्क्शन कमी होते आणि हे रेग्युलेशनला प्रभावित करतं, यामुळे झोप येत नाही किंवा झोप पूर्ण होत नाही. यानंतर दिवसभर शरीर थकतं आणि आपल्या क्षमतेवर परिणाम होतो. मुलांबद्दल बोलायचं झालं, तर प्रौढांपेक्षा छोट्या मुलांनी जास्त वेळ झोप घ्यावी, यामुळे त्याचे आरोग्य सुदृढ राहते. आम्ही तुम्हाला एक चार्ट वर दिला आहे, यात तुम्ही वयानुसार किती झोपायला पाहिजे हे पाहू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.