Smoking Harms: धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे सर्वांना माहित असतानाही बरेच लोकं चरस, गांजा, हुक्का, बिडी आणि सिगारेट पिणं टाळत नाही. क्षणिक आनंद देणारा हा छंद हळूहळू आपलं शरीर पोकरत जातं. या वाईट सवयीपासून जितक्या लवकर सुटका होईल तितकं चांगलं. मधुमेहाच्या रुग्णासाठी धुम्रपान स्लो पॉइजन सारखंच आहे. डॉ. इम्रान अहमद यांनी सिगारेट ओढण्याचं दुष्परिणाम सांगितलं आहेत. चला जाणून घेऊया धूम्रपानाचे दुष्परिणाम.
- उच्च रक्तदाब: आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की, उच्च रक्तदाबामुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जे लोक जास्त धूम्रपान करतात त्यांना उच्च रक्तदाब असतो. धूम्रपान केल्यास रक्तवाहिन्या फुगतात. यामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.
- रक्तातील साखर वाढेल: सिगारेट ओढल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं. तंबाखूमुळं मधुमेह आणि इतर आजारांवरील औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो. मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
- कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते: धूम्रपान केल्यानं कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. यामुळे कोरोनरी धमनी रोगाचा धोका वाढू शकतो. यावर नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकाराचा झटका येणं जवळपास निश्चित आहे.
- रक्ताभिसरणावर परिणाम: धुम्रपान केल्यानं रक्ताभिसरणावरही परिणाम होतो. यामुळे शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्ताद्वारे ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे शरीर आणि पायांमध्ये वेदना होतात.
संदर्भ
https://www.nhlbi.nih.gov/health/heart/smoking
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)