ETV Bharat / health-and-lifestyle

त्वचेसह हृदयाच्या आरोग्यासाठी 'अंकुरित मूग' फायदेशीर

Benefits Of Sprouted Green Gram: शरीरातील खराब चरबीसह रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अंकुरलेले मूग खाणं फायदेशीर आहे. जाणून घेऊ यात अंकुरीत मुंगाचे आरोग्यदायी फायदे.

Benefits Of Sprouted Green Gram
अंकुरलेले मूग (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 7, 2024, 5:14 PM IST

Updated : Oct 8, 2024, 9:40 AM IST

Benefits Of Sprouted Green Gram : धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आयुष्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. अनियमित आहार पद्धतीमुळं आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या आजाराचे बळी पडत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे शरीरात जीवनसत्त्व आणि प्रथिनांची कमतरता असते. तुम्हीदेखील या समस्येनं त्रस्त आहात का? शरीरातील प्रोटीन्स आणि व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी अंकुरलेले मूग अत्यंत फायदेशीर आहेत. यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्व, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट्स, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. यामुळे अंकुरलेले मूग खाल्ल्यास आरोग्यविषयक अनेक फायदे होऊ शकतात. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी अंकुरलेले मूग एक उत्तम पर्याय आहेत. तसंच बद्धकोष्ठता, कर्करोग आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अंकुरित मूग मदत करतात.

Benefits Of Sprouted Green Gram
अंकुरलेले मूग (Getty Images)
  • अंकुरलेल्या मुगाचे आरोग्यदायी फायदे
  • पचन सुधारते : अंकुरलेल्या मुगांमध्ये अनेक एन्झाइम्स असतात. यामुळे चयापचय सुधारण्यास मदत होते. आम्लपित्त टाळण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठीदेखील हे चांगले आहे.
  • वजन कमी करण्यासाठी फायदेशीर : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य खानपानामुळे अनेकांना वजनासंबंधित समस्या उद्भवतात. अंकुरलेले मूग वजन कमी करण्यासाठी उत्तम आहेत. कारण यामध्ये फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते : अंकुरलेल्या मुगामध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात असतं. यामुळे शरीरात पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते. तसंच यामध्ये व्हिटॅमिन 'ए' देखील मुबलक प्रमाणात आढळतं. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अंकुरित मूग सर्वोच्च पर्याय आहे.
  • हृदयाचं आरोग्य सुधारतं : अंकुरलेल्या मुगामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडस्, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळतात. हे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवतात. यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म आणि ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड हृदयाच्या आरोग्याचं रक्षण करण्यास मदत करतात. तसंच अंकुरलेले मूग खाण्यामुळं उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • डोळ्यांचं आरोग्य सुधारतं : यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्यानं डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते. दृष्टी सुधारण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.
  • मधुमेह : अंकुरलेले मूंग ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतात. यामुळं रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळं मधुमेही रुग्णांनी कोणत्याही भीतीशिवाय अंकुरलेल्या मुगाचं सेवन करावं.
  • त्वचेसाठी उपयुक्त: अंकुरलेल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. यामुळं त्वचेचं संरक्षण होतं. यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळं त्वचा निरोगी राहते.

संदर्भ

https://www.healthline.com/health/headache-tea#takeaway

https://www.newscientist.com/article/2414348-the-chemist-who-told-us-to-put-salt-in-our-tea-explains-why-she-did-it/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. मधुमेह ग्रस्तांनी नाश्त्यात घ्या 'हे' पदार्थ - Breakfast For Diabetes Patient
  2. मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात आत्मसात करा 'ही' सवय - Benefits Of Walking

Last Updated : Oct 8, 2024, 9:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.