Almonds To Eat According To Age : रोज सकाळी असे पदार्थ खायला हवेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. त्यापैकीच एक आहे बदाम. शरीरासोबतच मेंदुचं आरोग्य सुधारायचं असेल तर बदामाचा आपल्या आहारात समावेश करावा. मात्र, बदाम खाण्याची योग्य पद्धत आपणास माहिती नसल्यामुळे अनेकदा त्याचे पाहिजे तसे फायदे आपणांस मिळत नाही. आज हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
बदाम सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. रोज बदाम खाल्ल्यास मेंदू तल्लख होण्यास मदत होते. बदामामध्ये असलेले लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदमामध्ये अॅंटीऑक्सिडंट्स पुरेशा प्रमणात असतात. शरीरिरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी बदाम खाणं उपयुक्त आहे.
आहारतज्ञ रोजेश जॉर्ज यांच्या मते, मुलांनी आणि प्रौढांनी भिजलेले बदाम खावेत. यामुळे मेंदू तल्लख होतो. तसंच पोट आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेले बदाम फायदेशीर आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतं शिवाय वजन कमी करण्यासाठी देखील बदाम महत्त्वाची भूमिका बजावतो.
बदामामध्ये असलेले लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. 2017 मध्ये 'डर्माटोलॉजी रिसर्च अँड प्रॅक्टिस जर्नल'मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, संशोधकांना असे आढळून आले की, बदाम खाल्ल्यानं त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. हे संशोधन स्पेनच्या कॉम्पुटेन्स विद्यापीठातील त्वचाविज्ञानाचे प्राध्यापक मारिया कॅस्टिलो केलं होतं.
- दररोज किती बदाम खावेत?
निरोगी राहण्यासाठी प्रौढ व्यक्ती दररोज 20 बदाम खाऊ शकतात. चांगला परिणाम हवा असेल तर नाश्त्यापूर्वी बदाम खावे. लहान मुलांना (१-३ वर्षे वयोगटातील) दररोज ३ ते ५ बदाम खाऊ घालावेत, असा सल्ला दिला जातो. 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांना दररोज 5 ते 9 बदाम खाऊ घालू शकतात. 9 ते 18 वर्षे वयोगटातील लोकांनी दररोज 10 बदाम खाल्ल्यास ते निरोगी राहू शकतात.
- कसं खावं : तुम्ही सुके बदाम खावू शकता. परंतु चांगला परिणाम हवा असेल तर भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर आहे.
- बदाम सेवन करताना घ्यावयाची काळजी : जास्त बदाम खाल्ल्यानं आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दररोज भरपूर बदाम खाण्याचे काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
गरजेपेक्षा जास्त बदाम खाण्याचे दुष्परिणाम
- वजन वाढणे: सुमारे 100 ग्रॅम बदामामध्ये 50 ग्रॅम फॅट असतं. बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट देखील असतात. त्यामुळे जास्त बदाम खाल्ल्यानं वजन वाढू शकतं.
- बद्धकोष्ठता: बदामामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. मात्र, जास्त बदाम खाल्ल्यानंतर पाणी न पिल्यास बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बदाम खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे.
- किडनी स्टोन: बदामात, सर्व काजू आणि बियांप्रमाणेच, ऑक्सलेट नावाचे नैसर्गिक रसायन असते. त्यांच्या जास्त सेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. 2015 मध्ये, जर्नल ऑफ यूरोलॉजीनं प्रकाशित केले की जे लोक भरपूर बदाम खातात त्यांना किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त असते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)