ETV Bharat / health-and-lifestyle

स्वयंपाक घरातील लसूणाचे असंख्य फायदे; कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित - Benefits Of Eating Garlic - BENEFITS OF EATING GARLIC

Benefits Of Eating Garlic लसूण वजन कमी करण्यास कसं मदत करतो? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो, परंतु त्याचं उत्तर कुणाला माहिती नसेल. अशा परिस्थितीत लसणाच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती आजच्या या बातमीत देण्यात आली आहे.

Benefits Of Eating Garlic
लसूण खाण्याचे फायदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Aug 24, 2024, 5:26 PM IST

Updated : Aug 24, 2024, 5:32 PM IST

हैदराबाद Benefits Of Eating Garlic स्वयंपाक घरातील हा घटक तुमच उच्च कोलेस्टेरॉल कमी करु शकतो. धावपळीच्या जीवनात अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये आहाराची अयोग्य पद्धतीची भर पडल्यामुळे अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. अनेक सायलंट किलर आजार चोरपावलांनी शरीरात शिरकाव करत आहेत. बरेच व्यक्ती पोटाशी संबंधित आजार, मधुमेह, हृदयविकार तसंच बद्धकोष्टाच्या आजारांनी त्रस्त आहेत. जनसामान्याना भेडसवणारी सामान्य समस्या म्हणजे उच्च कोलेस्टेरॉल. आजकाल बहुतेक लोकं उच्च कोलेस्टेरॉलने त्रस्त आहेत. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याकरिता अनेक जण ना-ना प्रकारचे उपाय करतात. परंतु आपल्या स्वयंपाक घरात असलेला एक घटक उच्च कोलेस्टेरॉलची समस्या दूर करु शकतो हे अनेकांनी माहिती नाही. चला तर मग जाणूया स्वयंपाक घरातील या घटका बद्दल जे तुमचं उच्च कोलेस्टेरॉल पातळी कमी करु शकतं.

तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी अतिशय सहज पद्धतीने कमी करू शकता? कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी रोज कच्च्या लसणाचं सेवन करणं पुरेसं आहे. लसूण अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शरीरातील चरबी लवकर वितळण्यास मदत होते असं मत डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

"ईटीव्ही भारतशी बोलताना हैदराबादचे आयुर्वेदिक डॉक्टर नहुष कुंटे म्हणाले की, जेवण करण्यापूर्वी लसणाच्या दोन पाकळ्या चघळणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतात. यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो. लसूण उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतं. तसंच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी लसूण उपयुक्त आहे.''

खाण्याआधी लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात

लसूण हा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचा चांगला स्रोत मानला जातो. लसणामध्ये सल्फाइट संयुगे असतात. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. तसंच हे हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास देखील उपयुक्त आहे. त्याचबरोबर लसूणामध्ये व्हिटॅमिन सी पुरेसा असतो.

लसणामध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात, यामुळे विविध संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. लसूण सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यास देखील मदत करू शकते. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या काळात लसूणाचा आहारात समावेश करा.

  • लसूण खाण्याचे फायदे

पचनसंस्था सुधारते : अनेकांना पचनासंबंधित समस्या असतात. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाव्यात. यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते. लसणामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अ‍ॅंटी मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. जे गॅस, अ‍ॅसिडिटी तसंच पोटदुखी सारख्या समस्यांपासून बचाव करु शकतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढते : कच्चा लसूणामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि सल्फरसारख्या संयुगे आहेत. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

भूक नियंत्रित करण्यास मदत : लसूण भूक कमी करण्यासाठी देखील ओळखलं जातं. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला भूक नियंत्रित करणे आवश्यक आहे.

वजन कमी होते : सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्यास तुमचे वजन झपाट्यानं कमी होईल. कारण यामध्ये असलेले काही संयुगे शरीरातील चरबी वितळविण्यास मदत करतात.

मानसिक आरोग्य सुधारतो : मानसिक आरोग्यासाठी चांगलं ठेवण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. लसूणाच्या सेवनाने मन संतुलित राहेत. आणि डिप्रेशनशी लढण्याची ताकद मिळते. तणावमुक्त जीवन जगण्याकरिता अनेकांना लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. किडनीच्या आरोग्याकडं 'या' टिप्स फॉलो करून द्या लक्ष, अन्यथा गंभीर होऊ शकतात आजार - keep Your Kidney fit
  2. वजन कमी करायचंय ? नियमित करा हा उपाय - Benefits Of Walking

Last Updated : Aug 24, 2024, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.