हैदराबाद Yoga Asanas To Loose Fat : आजच्या काळात प्रत्येकाला आपण इतरांपेक्षा देखनं दिसावं अशी अपेक्षा असते. मग तो पुरुष असो वा स्त्री. आपण इतरांपेक्षा हटके दिसावे याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. विशेषतः महिला आपलं सौदर्यं जपण्याकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या सौदर्यं उत्पादनांचा अतिशय कौशल्याने वापर करतात. याचं एकमेव कारण म्हणजे तिला तिचं वाढते वय लपवायचे असते. इतरांना आपलं वय समजू नये याकरिता सर्वात महागडी सौदर्यंप्रसाधने खरेदी करायला हरकत नाही. परंतू तुम्हाला कोणत्याही कॉस्मेटिक उत्पादनाशिवाय सुंदर दिसायचे आहे का? यासाठी काही योगासनांची माहिती घेणे तुमच्यासाठी महत्वाचं आहे.
ही आसने करा रहा निरोगी : काही योगासने करुन तुम्ही सहज नैसर्गिक सौदर्य प्राप्त करु शकता ज्यात विशिष्ट आसन आणि प्राणायाम समावेश आहे. ज्यामुळे चेहऱ्याच्या स्थायूंवर थोडा दबाव येतो. त्यामुळे चेहरा आणि मानेमध्ये रक्त प्रावह वाढते. परिणामी चेहऱ्यावरची चरबी वितळते. शरीर मजबूत होतो तसेच शरीराला चांगला आकार येतो. जर तुम्हाला तुमची त्वाचा निरोगी आणि चमकदार हवी असेल तर लगेच योगासनाला सुरुवात करा. दररोज ही आसने तुम्ही केल्यास कोणत्याही सौदर्यप्रसाधनांची गरज तुम्हाला भासणार नाही.
सिद्ध वॉक : सिद्ध वॉक हे शारीरिक आणि मानसिक लाभ देणारे सर्वात महत्त्वाचे आसन आहे. याला इन्फिनिटी वॉक असेही म्हणतात. तज्ज्ञांचे मते हे नियमीत चालण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. ८ क्रमांकाची कल्पान करा किंवा जमिनीवर काढा आणि ८ च्या आकारत चाला. जर तुम्ही २० ते ३० मिनिटे चालत राहील्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तसेच सुंदर आणि आकर्षक दिसाल.
पदहस्तासन (पदहस्तासन) : सरळ उभे राहा आणि दोन्ही हा नितंबावर ठेवा. डोकं आणि गुडघ्यावर आराम करा. हे आसन करताना, श्वास घ्या आणि श्वास सोडा. यामुळे तुमचा चेहरा, मान आणि संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण सुधारते. तसेच डोकेदुखी आणि निद्रानाशाच्या समस्यत आराम मिळतो.
धनुरासन (धनुरासन) : धनुरासन हे एक असे आसन आहे ज्यामध्ये शरीर धनुष्याच्या आकारात वाकलेले असते. जमिनीवर पोटाच्या आधारे झोपा, पाय जवळ ठेवा. पाठ वाकवा आणि पाय हातांनी धरा. 15 ते 20 सेकंद असेच राहा आणि आराम करा.
चक्रासन : या आसनात शरीर चाकाच्या आकारात दिसते. म्हणून त्याला चक्रासन म्हणतात. यासाठी सर्वप्रथम झोपावे. नंतर पाय वाकवून हात खांद्याच्या खाली ठेवा. श्वास घ्या आणि श्वास सोडा आणि कंबर शक्य तितकी उंच करा. मान खाली लटकत ठेवा. हा आसान 15 ते 20 सेकंदांसाठी करा.
हलासन: मॅटवर पाठीवर झोपावे. हाथ शरीराच्या जवळ ठेवा. श्वास घेत पाय वरच्या बाजूला उचला. आपले पाय ९० अंश आकारात वाढवा आणि पायाला डोक्याच्या वर जमिनीच्या दिशेने मागे घ्या आणि पायाच्या बोटांनी जमिनीवर स्पर्श करा. कमरेतून हात काढा आणि सरळ जमिनीवर ठेवा. कंबर जमिनीसी समांतर राहील अश्या स्थितीत ठेवा. या आसनामुळे पाठीवर थोडासा दबाव पडत असला तरी चेहऱ्याच्या स्नायूंची क्रिया वाढते आणि चरबी वितळते.
महत्वाची सुचना
वर दिलेली आरोग्य माहिती, वैद्यकीय टिप्स आणि सूचना केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. आम्ही ही माहिती वैज्ञानिक संशोधन, अभ्यास, वैद्यकीय आणि आरोग्य व्यावसायिक सल्ल्यांवर आधारित देत आहोत. परंतू या गोष्टी करण्यापूर्वी वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा