ETV Bharat / health-and-lifestyle

सावधान! 'टू मिनट्स नूडल्स' ठरू शकतात घातक - NOODLES SIDE EFFECTS

लहानांपासून मोठ्यांना नूडल्स खानं आवडतं. दोन मिनिटात तयार होणारं हे नूडल्स मात्र, शरीरासाठी घातक आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Noodles Side Effects
न्यूडल्स (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 17, 2024, 2:49 PM IST

Noodles Side Effects: अगदी दोन मिनिटात तयार होणारं नूडल्स लहानांसह थोरांना खायला आवडतं. कोणताही आटा-पिटा न करता अगदी सहज तयार होणाऱ्या नूडल्सनं अनेकांच्या ब्रेकफास्ट आणि ब्रन्चची जागा घेतली आहे. एवढंच नाही तर मुलं हे आवडीनं खातात म्हणून पालक मुलांच्या डब्यामध्ये देखील नूडल्स देतात. एखाद्या वेळी रात्री जेवण तयार करण्यास कंटाळा आला की आपण नूडल्सवर काम भागवतो. मात्र, झटपट तयार होणारं हे चायनिज आयटम आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊ या हा पदार्थ किती घातक ठरू शकतो.

Noodles Side Effects
नूडल्स (ETV Bharat)
  • पौष्टिकतेची कमतरता: नूडल्समध्ये पोषक तत्वं प्रमाणात कमी असतात. जीवनसत्त्वं, खनिजं, प्रथिनं आणि फायबर यांसारखे पोषक घटक त्यात अजिबात आढळत नाहीत. शिवाय कॅलरीज भरपूर प्रमाणात आहेत. कर्बोदकं आणि अस्वास्थ्यकर चरबीमुळं याच्या सेवनानं शरीराचं वजन वाढतं. नियमितपणे नूडल्स खाणाऱ्यांमध्ये कुपोषणाची लक्षण सुद्धा दिसून येतात.
  • लठ्ठपणा: नूडल्सला चांगली चव यावी याकरिती त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट मिसळलं जातं. त्याच्या वापरामुळं डोकेदुखी, मळमळ, वजन वाढणं, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवतात. तज्ञांच्या मते नूडल्स जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतात.
  • उच्च रक्तदाब: सोडियम हा शरीरातील सर्वात धोकादायक पदार्थांपैकी एक आहे. नूडल्समध्ये मुबलक प्रमाणात सोडियम असते. तज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात सोडियमचं सेवन केल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्यांना हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी ताबडतोब नूडल्स खाणं बंद करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
  • मैदा: नूडल्स तयार करण्यासाठी वापरला जाणारा मुख्य घटक मैदा हा आहे. यासाठी अत्यंत प्रक्रिया केलेलं पीठ वापरलं जातं. संपूर्ण धान्याच्या तुलनेत मैदामध्ये आहारातील फायबर आणि पोषक तत्वं खूप कमी असतात. परिणामी, रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. मैदाच्या जास्त सेवनानं साखरेची समस्या आणि इन्सुलिनची पातळी कमी होण्यासारख्या समस्या उद्भवतात.
  • आरोग्यास धोका: पोषणतज्ञाच्या मते, नूडल्सचं नियमित सेवन आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळं मेटाबॉलिक सिंड्रोम होऊ शकतो. तसंच उच्च रक्तदाब, मधुमेह, कंबरेभोवती चरबी जमा होणे तसेच कोलेस्टेरॉल असंतुलीत होते. एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, शरीराला आवश्यक असलेलं व्हिटॅमिन डी देखील नूडल्समध्ये कमी प्रमाणात असतं. शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती आपोआप कमी होते.
  • खराब कोलेस्टेरॉल: नूडल्स पाम तेलामध्ये तळलेले असतात. परिणामी, उच्च संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ करतात. या चरबीच्या अतिरेकामुळे एथेरोस्क्लेरोसिस होतो. तसंच हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यामुळं हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5449380/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. 'हे' ड्रायफ्रुट्स करणार हृदयविकारापासून तुमचा बचाव
  2. 'ही' लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या! तुम्हालाही असू शकतो 'ब्रेन स्टोक'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.