ETV Bharat / health-and-lifestyle

मोतीबिंदू-कॉर्निया प्रत्यारोपणात भारत यूकेच्या पुढं.. डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव - Cornea Transplant

author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 13, 2024, 2:35 PM IST

Updated : Sep 13, 2024, 2:40 PM IST

Cornea Transplant : हैदराबादमधील एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूट कॉर्निया प्रत्यारोपणाच्या 50,000 प्रकरणांचा टप्पा पार करत विक्रम नोंदविला आहे. अनेक विकसनशील देशांमध्ये हा आतापर्यंतचा सर्वात जास्त आकडा आहे. ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत, एल. व्ही. प्रसाद आय संस्थेचे संस्थापक डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव आणि त्यांच्या टीमच्या प्रमुख सदस्यांनी विशेष मुलाखतीत ही माहिती दिली.

Corneal Transplant
एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूट संस्थापक डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव (ETV Bharat)

हैदराबाद Corneal Transplant : एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट((LVPEI) या संस्थेनं देशातील नेत्रचिकित्सेला एक नवीन स्वरुप प्रदान केलं आहे. तीन दशकांपूर्वी हैदराबादमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. 50,000 प्रत्यारोपणाचा टप्पा गाठणारी पहिली जागतिक संस्था ठरली आहे, अशी माहिती संस्थापक डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली. यावेळी ईटीव्ही भारतनं संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रशांत गर्ग आणि एलव्हीशी संलग्न असलेले शांतीलाल संघवी आणि कॉर्निया इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. प्रवीण वडवल्ली यांच्याशी देखील संवाद सांधला.

आतापर्यंतचा प्रवास कसा झाला?

LVPEI चे संस्थापक डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव यांनी सांगितलं की, त्यांचा हा एक अद्भुत प्रवास होता. भारतामध्ये शक्य नसलेल्या क्षेत्रात आम्ही एक उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. जेव्हा आम्ही प्रवास सुरू केला तेव्हा सर्वांनी मला हा मार्ग न घेण्यास प्रवृत्त केलं. कारण आतापर्यंत यात नेहमीच अपयश मिळालेलं होतं. पण, आम्ही प्रवास सुरू ठेवला आणि तो यशस्वी झाला. अनेक लोक आणि संस्थांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं. या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या लोकांचा मी ऋणी आहे. अनेकांना मी ओळखतही नाही. ज्या हजारो नेत्रदात्यांमुळे हे शक्य झालं त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आम्हाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी ते नसते तर आम्ही हे साध्य केलं नसतं. भारतात कोणीही नेत्रदान करत नाही, हा समज आम्ही चुकीचा सिद्ध केला आहे. जर तुम्ही इतरांना पटवून दिलं की नेत्रदान करणं किती गरजेचं आहेत तर साहजिकच लोक नेत्रदाणाला घाबरणार नाही. आमच्या अनुभवानुसार, किमान 60 टक्के कुटुंबांनी त्यांचे नेत्रदान करण्यास संमती दिली. ही संख्या अमेरिकन रुग्णालयापेक्षा चांगली आहे.

अवयव दान आणि प्रत्यारोपणाबद्दल माहिती नसल्यामुळे लोकं सहसहा तयार होत नाहीत. अशात तुम्ही लोकांना नेत्रदान करण्यासाठी कसं जागृत करता?

असा प्रश्न केलं असता ते म्हणाले की, बऱ्याच लोकांमध्ये जनजागृती होती. त्यांना नेत्रदान केल्याचे फायदे माहिती होते आणि लोक इच्छुक देखील होते. आम्ही फक्त त्यासाठी प्रयत्न करत नव्हतो. सर्वात आधी आम्ही स्वतः अभ्यास केलं. त्यानंतर जनतेमध्ये जाऊन जनजागृती केली. यासाठी आम्हाला अमेरिकेतील काही संस्थाचं फार सहकार्य लाभलं. आंतरराष्ट्रीय कॉर्निया ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटच्या बरोबरीने आमची नेत्रपेढी आणि प्रणाली स्थापित करण्यात त्यांनी आम्हाला मदत केली. मी स्वतः यूएसमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि भारतात परत आल्यावर येथील अनेक डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे कार्य केलं. त्यामुळे डॉक्टर देखील प्रशिक्षित झाले आणि कॉर्निया दाता देखील मिळू लागल्यामुळे हा प्रवास सोपा झाला.

हे सर्व खूप आशादायक वाटत असले तरी काही आव्हाने असतील. अधिक लक्ष देण्याची गरज असलेल्या क्षेत्रांबद्दल तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता?

या प्रश्नाचं उत्तर देताना कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रशांत गर्ग म्हणाले की, प्रत्यारोपणानंतर यशाचा दर सुधारण्यासाठी माझी टीम फार मेहनत घेत होती. अनेक लोक फॉलोअपसाठी हॉस्पीटमध्ये येत नाहीत. जर ते फॉलो-अपसाठी परत आले नाहीत, तर त्यात यश मिळण्याची शक्यता कमी होते. लोकांना हे समजले पाहिजे की फॉलोअप खूप महत्वाचे आहे आणि त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि सूचनांचं पालन केलं पाहिजे. हे केल्याशिवाय प्रत्यारोपण करण्यात काही अर्थ नाही.

भारतात कॉर्निया प्रत्यारोपणाचा यशस्वी दर किती आहे?

डॉ. प्रशांत गर्ग या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले की, सर्वसाधारणपणे, सर्व घन अवयव प्रत्यारोपणामध्ये कॉर्निया प्रत्यारोपणाच्या यशाचा दर सर्वात जास्त असतो. प्रामुख्याने कॉर्निया प्रत्यारोहणासाठी नुसतं रक्त पुरवठ्यावर अवलंबून न राहता डोळ्याच्या आतील ऑक्सिजन आणि वातावरणातून मिळणाऱ्या पोषण घटकावर अवलंबून राहावं लागतं. म्हणूनच जेव्हा आपण कॉर्निया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करतो, तेव्हा शरीराला ते इतरांचं आहे हे ओळखता येत नाही. म्हणूनच शरीर इतर अवयवांपेक्षा ते अधिक सहजपणे स्वीकारते. असे काही रोग आहेत जेथे कॉर्निया प्रत्यारोपणाचे यश 96 ते 97 टक्के कमी आहे. संसर्गजन्य काही आजारांमध्ये यश मिळण्याचा दर कमी असू शकतो. परंतु जरी यशाचा दर कमी असला तरी वस्तुस्थिती अशी आहे की कॉर्निया प्रत्यारोपण पहिल्या वेळी कार्य करत नसले तरी दुसऱ्यांदा यशस्वीपणे पुनरावृत्ती होऊ शकते. यामुळे आपला विश्वास बळावतो. कॉर्निया प्रत्यारोपणाने आपण अंधत्व बरे करू शकतो. यामुळे अंध लोकांना एक नवीन जीवन प्रदान होते. ते जग पाहू शकतात.

डोळ्यांच्या समस्येनं ग्रस्त कोणत्या व्यक्तीला कॉर्नियल प्रत्यारोपणाची गरज असते?

शांतीलाल संघवी कॉर्निया इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. प्रवीण वडवल्ली यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं की, आम्ही सर्वप्रथम रुग्णांना कार्नियल प्रत्यारोपणाची गरज पडूच नये यासाठी प्रयत्न करतो. योग्य तपास करत निदान झाल्यानंतर टप्प्या-टप्यानं योग्य उपचार करत कॉर्नियल प्रत्यारोपण रोखता येतं. प्रत्यारोपण करण्याची गरज पडलीच तर लेयर-बाय-लेयर प्रत्यारोपणास आम्ही प्राधान्य देतो. कारण या प्रक्रियेचा सक्सेस रेट जास्त आहे. एकदा प्रत्यारोपण झाल्यानंतर, डॉक्टर आणि रुग्ण दोघांमध्ये आयुष्यभराची बांधिलकी तयार होते. प्रत्यारोपणाची काळजी आपण आयुष्यभर घेत राहिलं पाहिजे.

तुम्ही कॉर्नियल आय बँकेचे व्यवस्थापन करत आहात. हे करताना कोणती आव्हाने येतात?

संचालक डॉ. प्रवीण वडवल्ली सांगितलं की, जर मी देशातील नेत्रपेढीच्या स्थितीबद्दल बोललो तर आपल्या देशात अनेक समस्या आहेत. आपल्या देशात जवळपास 200 नेत्रपेढ्या आहेत, परंतु त्यातील 90 टक्के नेत्रपेट्या अकार्यक्षम आहेत. त्यांच्याकडे कॉर्निया प्रत्यारोपण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. देशात सध्या गोळा केलेल्या 60,000 कॉर्नियापैकी 70 टक्के कॉर्निया फक्त 10 नेत्रपेढ्यांच्या मदतीनं गोळा केलं जातं. याचाच अर्थ नेत्रपेढ्या देशात स्टेटस सिम्बॉल झाल्या आहेत. कोणत्याही नेत्रपेढीत बांधिलकी नसते. आम्ही दरवर्षी 12,000 पेक्षा जास्त कॉर्निया गोळा करू शकतो, जे संपूर्ण देशात गोळा केलेल्या कॉर्नियापैकी सुमारे 20 टक्के आहे.

नेत्रपेढी सुरू करणारे बरेच लोक मानवी संसाधनांना प्रशिक्षण देण्यासाठी गुंतवणूक करत नाहीत. ते तंत्रज्ञ आणि सल्लागारांना प्रशिक्षण देत नाहीत. त्यामुळे नेत्रपेढीची कामं कमी प्रशिक्षित किंवा अप्रशिक्षित लोकांच्या हाती जातात, त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात. दुसरा मुद्दा वैदकीय व्यवस्थेचा. कॉर्निया गोळा करत असताना त्याची गुणवत्ता योग्य ठेवणे गरजेचं आहे, कारण या कार्नियाचं आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करणार आहोत. त्याची गुणवत्ता योग्य नसल्यास रोग पसरण्याचा संभाव्य धोका जास्त असतो. केवळ एका व्यक्तीकडून कॉर्निया घेणं आणि त्याचं दुसऱ्यामध्ये प्रत्यारोपण करणं ही एकच बाब नाही, तुम्हाला काही वैद्यकीय मानकांचे पालन करणं आवश्यक असतं, जेणेकरून कॉर्निया प्रत्यारोपणाचे इच्छित उद्दिष्ट साध्य होईल. अनेक वैद्यकीय संस्था या प्रोटोकॉलचं पालन करत नाहीत.

LVPEI इतर राज्यांना नेत्रपेढी उभारण्यासाठी मदत करत आहे. हे कसं कार्यरत होइल?

संस्थापक डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव म्हणाले, ऑर्बिस इंटरनॅशनल सोबत मिळून आम्ही हे काम करत आहोत. त्यांनी एक कार्यक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये त्यांनी देशभरातील 10 नेत्रपेढ्यांची ओळख करून दिली असून नेत्रपेढीची गुणवत्ता सुधारण्याची जबाबदारी आम्हाला दिली आहे. आम्ही सर्वात पहिली नेत्रपेढी ऋषिकेश येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे सुरु केली. त्यानंतर कोरोना काळात बनारस येथील हिंदू विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ही स्थापन करण्यात आली. अलीकडेच पटना आणि रांची येथे देखील नेत्रपेढी सुरु करण्यात आली आहे. देशातील अनेक भागात नेत्रपेढीचे असेच मॉडल तयार करण्यात येणार आहेत. आम्ही नेत्रपेढी सुरु झाल्यानंतर त्या सेंटरला स्वावलंबी होईपर्यंत किमान दोन वर्षे मदत करतो.

कॉर्निया दानाबाबत जनजागृती करण्यासाठी तुम्ही काही वर्षांपूर्वी समुपदेशन प्रणाली सुरू केली होती. या उपक्रमाबद्दल आणि ते कसे कार्य करते ते आम्हाला सांगा?

संस्थापक डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव म्हणाले की, आम्ही सर्वप्रथम कुटुंबियांना प्रशिक्षण देतो. जेव्हा आम्हाला कळते की, कुटुंबातील सदस्य हॉस्पीटलमध्ये भरती आहे परंतु त्याची जिवंत राहण्याची शक्यता नाही. त्यावेळी आम्ही कुटुंबातील सदस्यांचं समुपदेशन सुरु करतो. त्यांना सांगतो की, कॉर्निया दानामुळे एखाद्याचं आयुष्याला नवीन प्रेरणा मिळते. त्यांच्या योग्यदानामुळे इतर व्यक्ती जग पाहू शकेल. मी 12 वर्षे यूएसएमध्ये राहिलो, तेव्हा मला याबद्दल जाणीव झाली. पहिली सात वर्ष खूप खराब गेली, कारण कॉर्निया उपलब्ध नव्हते. कॉर्निया उपलब्ध झाल्यानंतर आम्हाला ऑपरेशन करावं लागे.

अनेकदा आम्ही मध्यरात्री कॉर्निया ट्रान्सप्लांट करायचो. त्यावेळी रुग्णांना कॉर्निया काढण्यासाठी महिनो न महिने वाट पाहावी लागत होती. कॉर्नियाची गरज असलेल्या लोकांची प्रतीक्षा यादी असायची. त्यानंतर रुग्णालयात कॉर्निया पुनर्प्राप्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला. रातोरात गोष्टी बदलल्या. ज्याप्रमाणे मी मोतीबिंदू शस्त्रक्रियेची योजना आखतो त्याचप्रमाणे कॉर्नियल प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मी रूग्णांची योजना करू शकलो. मला हे भारतात आणायचं होतं आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये ते लागू करायचं होतं. कृतज्ञतापूर्वक, सुरुवातीला निजामांचा पाठिंबा होता, नंतर इतर रुग्णालयांकडून आणि आता अनेक रुग्णालय आम्हाला मदत करतात.

जरी आपण वैद्यकीय तंत्रज्ञानात प्रगती केली आहे आणि अपयशाची शक्यता कमी झाली आहे, तरीही लोक त्यांच्या शरीरातील इतर समस्यांपेक्षा डोळ्यांशी संबंधित समस्या अधिक टाळतात. याचे कारण काय असू शकते?

डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव यावर म्हणाले की, भारतामध्ये कॉर्निया जनजागृती बद्दल अभाव होता, परंतु आता तसं नाही. सर्वत्र सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत नाही. उपचाराचं कॉस्ट देखील जास्त नाही. सरकारी रुग्णालयामध्ये उपचार उपलब्ध असल्यामुळे खूप खर्च करावं लागत नाही. त्या सर्वत्र उपलब्ध असल्यानं सुविधा उपलब्ध होण्यास कोणतीही अडचण नाही. उपचारांची परवडणारी क्षमता ही देखील समस्या नाही कारण अशी अनेक सरकारी रुग्णालये आहेत. ज्यामध्ये फार कमी खर्चात उपचार होतो.

आपल्याकडे भारतात कुशल नेत्रतज्ज्ञ आणि नेत्रचिकित्सक आहेत का?

संस्थापक म्हणाले की, युनायटेड किंगडम आणि इतर विकसनशील देशांच्या तुलनेत आपल्याकडे 80,000 ते 100,000 कुशल डॉक्टर आहेत. डोळ्यांची काळजी घेण्याच्या बाबतीत आपण अनेक देशांच्या पुढं आहोत. सध्या, आपल्याकडे जगात सर्वाधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहेत (8 दशलक्ष). 90 च्या दशकात ते 1 दशलक्ष होते आणि गेल्या तीन दशकात आठ पट वाढलं आहे.

शेवटी, एक समाज म्हणून आपण कॉर्निया दानासाठी कसं योगदान देऊ शकतो?

डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव म्हणाले की, कॉर्निया दानात समाज म्हणून योगदान देण्यासाठी आपल्यामध्ये दानाची भावना असणे आवश्यक आहे. तुमच्या डोळ्यांसोबतच तुम्ही तुमचे इतर अवयव जसे की किडनी, हृदय आणि यकृत दान करून लोकांना मदत करू शकता. आपल्या शरीराचे अनेक भाग मृत्यूनंतर अनेकांना मदत करू शकतात. यासाठी सर्वप्रथम लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. त्यांना अवयव दानाबद्दल जागृत केलं पाहिजे. आपले अवयव दान करुन आपण इतरांचं भलं करु शकतो. लोकांचा आशीर्वाद हीच सर्वोत्तम संपती आहे.

हेही वाचा

  1. 'नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान' राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा का साजरा केला जातो; जाणून घ्या महत्व - Eye Donation Fortnight 2024
  2. डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी अवलंब करा 'ट्वेंटी-ट्वेंटीचा' नियम - Eye Health Ti

Last Updated : Sep 13, 2024, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.