ETV Bharat / health-and-lifestyle

World Cancer Day 2024 : वेळेवर निदान अन् उपचार केल्यानं बरा होऊ शकतो कर्करोग - World Cancer Day

World Cancer Day 2024 : जगभरातील लोकांना कॅन्सरसारख्या घातक आजाराबाबत जागरूक करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. गतवर्षीप्रमाणे यंदाही 'क्लोज द केअर गॅप' या संकल्पनेवर जागतिक कर्करोग दिन साजरा केला जात आहे. वाचा पूर्ण बातमी..

World Cancer Day
World Cancer Day
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 8:04 AM IST

Updated : Feb 4, 2024, 8:12 AM IST

हैदराबाद World Cancer Day 2024 : कर्करोगाच्या रुग्णांचं योग्य वेळी निदान आणि उपचार केले तर या आजारामुळे होणारे मृत्यू बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. जीवनशैली सुधारली आणि काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. परंतु सर्वसाधारणपणे असं होत नाही. किंबहुना, केवळ अनियंत्रित राहणीमानच नाही तर कर्करोगाच्या विविध प्रकारच्या लक्षणांबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसणे आणि रोगाचं निदान झाल्यानंतरही उपचार आणि काळजी न घेतल्यानं रोगाची तीव्रता तर वाढतेच आणि उपचारातही अडचणी येतात. याशिवाय, अनेक प्रकरणांमध्ये यामुळे पीडित व्यक्तीचा जीव जाण्याचा धोकाही वाढतो.

जागतिक कर्करोग दिन : कर्करोगाचे सर्व प्रकार, त्यांची कारणं, लक्षणं, तपासणी, उपचार आणि त्याच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या उपचार आणि काळजी पद्धतींबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशानं दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जातो.

डॉक्टर काय म्हणतात : इंदूरचे ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ आणि इंदूर कॅन्सर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. दिग्पाल धारकर यांच्या मते, कर्करोगाच्या बहुतांश घटनांमध्ये बैठी किंवा अस्वस्थ जीवनशैली, लठ्ठपणा आणि अनुवांशिक कारणं जबाबदार असतात. ते स्पष्ट करतात की, सध्याच्या काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींसह वाईट जीवनशैली ही सर्व वयोगटातील लोकांमध्ये विविध प्रकारच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांनाच नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या आजारांनाही कारणीभूत आहेत. याशिवाय, कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 10 टक्के प्रकरणांमध्ये अनुवांशिक कारणं देखील कारणीभूत असू शकतात.

कर्करोग शरीरात कुठेही होऊ शकतो : ते स्पष्ट करतात की, कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. परंतु बहुतेक प्रकारच्या कर्करोगात, जर रोगाची सुरूवातीस किंवा त्याच्या पहिल्या टप्प्यात पुष्टी झाली असेल, तर बहुतेक रुग्णांमध्ये संपूर्ण निदान शक्य आहे. मात्र तपासात उशीर झाला आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात हा आजार आढळून आला तर उपचारात अडचणी तर येतातच शिवाय पीडित व्यक्ती पूर्णपणे बरी होण्याची शक्यताही कमी होऊ शकते.

नियमित तपासणी करा : केवळ कर्करोगच नाही तर बहुतेक रोगांपासून बचाव करण्यासाठी निरोगी जीवनशैली, आहार पाळणं आणि आरोग्याविषयी जागरूक असणं खूप महत्वाचं आहे. यासाठी संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या आणि फळे असलेला पौष्टिक आणि संतुलित आहार वेळेवर खाणे आणि शिस्तबद्ध आणि सक्रिय जीवनशैली पाळणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करा. तसेच, शरीरातील कोणत्याही सततच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय धुम्रपान आणि नशा टाळा. तसेच, ज्या लोकांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास आहे त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणं फार महत्वाचं आहे.

जागतिक कर्करोग दिवस : 'जागतिक कर्करोग दिन' प्रथम 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघानं साजरा केला. 4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिस येथे झालेल्या जागतिक कर्करोग परिषदेत 'वर्ल्ड कॅन्सर अगेन्स्ट कॅन्सर फॉर द न्यू मिलेनियम' मध्ये 4 फेब्रुवारी 2000 रोजी नियमित वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जाऊ लागला. 2022 ते 2024 या काळात जागतिक कर्करोग दिन 'केअर गॅप बंद करा' या थीमवर एक मोहीम म्हणून साजरा केला जात आहे. याचा उद्देश जगाच्या कानाकोपऱ्यात कॅन्सरशी संबंधित सर्व समस्यांबाबत जनजागृती करणे, ज्यामध्ये रोगाची कारणं, लक्षणं आणि उपचार यांचा समावेश आहे. हे कार्य सोपं करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना या मोहिमेशी जोडणं हा आहे. कारण संघटित प्रयत्नांमुळे कर्करोगाचा जागतिक प्रभाव कमी करण्यात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठता येतो.

कर्करोगाशी संबंधित आकडेवारी : हे खरं आहे की, गेल्या काही वर्षांत जगभरातील जवळपास सर्वच भागात विविध प्रकारच्या कर्करोगानं ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. आकडेवारीबद्दल सांगायचं तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या कॅन्सर एजन्सी, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या मते, 2022 मध्ये कर्करोगाची सुमारे दोन कोटी नवीन प्रकरणं आढळून आली. तर या आजारामुळे सुमारे 97 लाख लोकांनी आपला जीव गमावला. जर आपण एकट्या भारताबद्दल बोललो तर, 2022 पर्यंत, भारतात कर्करोगाच्या 1,413,316 नवीन रुग्णांची नोंद झाली. ज्यामध्ये महिला रुग्णांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त होतं. या अहवालात जागतिक आरोग्य संघटनेनं अशी भीतीही व्यक्त केली आहे की जागतिक स्तरावर 2050 मध्ये कर्करोगाच्या नवीन रुग्णांची संख्या 35 दशलक्षांपेक्षा जास्त होईल, जी 2022 च्या तुलनेत 77 टक्के जास्त असेल.

हे वाचलंत का :

  1. पूनम पांडेला झालेला 'सर्वायकल कॅन्सर' नेमका काय असतो? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
  2. National Cancer Awareness Day : भारतात कॅन्सर रुग्णांची बिकट परिस्थिती; आरोग्य व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!

Last Updated : Feb 4, 2024, 8:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.