ETV Bharat / health-and-lifestyle

वजन कमी करण्यासाठी नव्हे तर मधुमेहावरही फायदेशीर आहेत रताळे

रताळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. याच्या नियमित सेवनानं मधुमेह, हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो. तसंच वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहेत

HEALTH BENEFITS OF SWEET POTATO
रताळे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Nov 13, 2024, 1:25 PM IST

HEALTH BENEFITS OF SWEET POTATO: हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारांमध्ये रताळ्यांची आवक सुरू झाली आहे. कंद-मूळ स्वरुपातील हे रताळे चवीला रुचकर, तुरट-गोड असतात. आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे रताळे नियमीत खाल्ल्यास शरीराला उपयुक्त ठरू शकते. रताळ्यांमध्ये पोषक घटकांचा खजिना दळलेला आहे. यात व्हिटॅमिन ए, सी आणि बी-3 मुबलक प्रमाणात आहेत. तसंच फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, खनिजे, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम पुरेशा प्रमाणात आढळतात. रताळ्याच्या सेनवानं वजन कमी होते शिवाय रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते. रताळ्यामध्ये आढळणाऱ्या थायमिन, कॅरोटीनोइड्स आणि फॉस्फरसमुळे हाडं मजबूत होतात. मधुमेहाच्या रुग्णांकरिता रताळे वरदानापेक्षा कमी नाहीत. यात आढळणाऱ्या कंपाऊंडमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याला विटंर सुपरफूड म्हणून देखील ओळखलं जाते.

  • मधुमेह प्रतिबंध: रताळ्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होवू शकतो. तसंच यात आढळणाऱ्या फायबरमुळे देखील मधुमेहाचा धोका कमी होतो. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही रताळे उकळून खाऊ शकता. परंतु मधुमेही रुग्णांनी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • त्वचेसाठी फायदेशीर: रताळे अ‍ॅंटिऑक्सिडेंट्सनं समृद्ध आहे. यामुळे त्वचा चांगली राहते. तसंच सौंदर्य वाढवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहेत. त्वचेचे फ्रि रॅडीकल्सपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी रताळे उपयुक्त आहेत. त्याचबरोबर अनेक जुनाट आजार दूर करण्यासाठी रताळ्याचं सेवन चांगलं आहे.
  • पचनक्रिया सुधारते: रताळ्यामध्ये फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. जे पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी चांगलं आहे. रताळ्याच्या नियमित सेवनानं गॅस सारख्या समस्या तसंच बद्धकोष्ठता सारख्या पोटासंबंधित समस्या दूर होतात.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते: रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी-6 असतात. जे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. रताळे नियमित खाल्ल्यास खोकला, सर्दी, फ्लू आणि इतर विषाणूजन्य आजार दूर राहतात.
  • हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर: रताळ्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रताळ्यामधील फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. परिणामी शरीरात चांगलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढते.
  • वजन कमी होतो: रताळ्यातील फायबर पोटावरील चरबी कमी कराण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करणाऱ्यांनी त्यांच्या आहारात रताळ्यांचा समावेश केल्यास वजन झपाट्यांन कमी होते. फायबरमुळे तुमचं पोट अधिक काळ भरलेले राहेत. यामुळे तुम्ही कमी खाता आणि वजन कमी होते.
  • तणाव कमी होतो: रताळ्यामध्ये आढळणाऱ्या बीटी कॅरोटीनमुळे स्ट्रेस कमी होतो.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC9495970/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

  1. 'या' आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही खावू नये अननस
  2. झटपट वजन कमी करण्यासाठी आजच फॉलो करा एक्सपर्ट टिप्स!
  3. मधुमेह आणि हृदयाचे आजार टाळण्यासाठी 'या' हिरव्या भाजीचा आहारात करा समावेश
  4. शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.