How To Make Papaya Face Pack: दिवाळीमध्ये इतरांपेक्षा वेगळं आणि सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटते. परंतु, सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि घरकामांमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. त्वचेवर टॅनिंग होते. महागडे प्रोडक्ट्स वापरून सुद्धा काही फरक पडत नाही. मात्र, घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून थोड्याप्रमाणात सुटका मिळवू शकता. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी पपई फार फायदेशीर आहे. याच पपईचा फेसपॅक तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पपई खाण्याचे आरोग्यविषयक अनेक फायदे देखील आहेत. व्हिटॅमिन सी, बी, ई आणि अ ने पपई समृद्ध आहे. तसंच पपईमध्ये पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स देखील भरपूर असतात. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि निर्जलीकरण रोखण्यात मदत करते. यामध्ये अँटिऑक्सिडेंट असल्याने त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या पपईचा त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी कसा उपयोग करता येईल ते पाहूया.
फेसपॅक कसा तयार करावा ?
- एक बाऊल घ्या. त्यात अर्धा कप पपईचा लगदा घाला. त्यानंतर त्यात अर्धा चमचा मध आणि हळद घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
- अर्धा कप पपईचे लहान-लहान तुकडे करा. त्यात दोन चमचे दूध आणि एक चमचा मध घालून चांगले मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावता येते. 10 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
- अर्धा कप पपईमध्ये एक पिकलेले केळ, एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून चांगलं मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. दहा मिनिटांनी स्वच्छ धुवा.
- पपईचा लगद्यामध्ये अर्धा चमच हळद घालून मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.
- अर्धा कप पपईच्या पल्पमध्ये दोन चमचे दही घालून चांगलं मिसळा. नंतर हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेला लावा आणि २० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
- पपईच्या लगद्यामध्ये दोन चमचे टोमॅटो रस घालून मिक्स करा. तयार झालेलं मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर तसंच मानेवर लावा. दहा मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा