Tips For Nail Art Stay Longer : आपलं सौंदर्य चार-चौघात खुलून दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. त्यासाठी ड्रेस, मेकअप, हेअरस्टाईल याकडं तर आपलं लक्ष असतंच. त्यासोबतचं आपल्या हातांची बोटं आकर्षक दिसावी म्हणून ‘नेल आर्ट’चा ट्रेंड महिला फॅालो करत आहेत. चला तर नेल आर्ट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहुयात.
आपली नखं चांगली दिसावी याकरिता आपण वेगवेगळे नेलपेंट्स लावतो. ऐवढेच नाही तर, ते उठून दिसावे म्हणून आता नेल आर्ट केलं जात आहे. आपण नेसलेली साडी किंवा ड्रेसला शोभतील, असे नेल आर्ट आता करून मिळतात. मात्र, त्याची योग्य काळजी घेतली नाही तर हेच नखं चांगली दिसत नाहीत. ही गोष्ट टाळण्यासाठी खालील उपाय करून पहा.
नख जास्त वाढवू नये: तज्ज्ञांच्या मते, नख जास्त वाढवू नये. दैनंदिन कामं लक्षात घेऊन आवश्यक तेवढी नखांची वाढ करावी. कारण काम करताना, कीबोर्डवर टायपिंग करताना, वजन उचलताना लांब नखं लवकर तुटण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, नखं तेवढेच वाढवा जेवढं आपल्या कामात अडथळा येणार नाही.
नेल आर्टचे आकर्षण लोप पावण्याचा धोका : जास्त लांब नखांवर नेल आर्ट केल्यास नख तुटल्यावर त्यावरील कलाही अर्धवट दिसू लागते. यामुळे नखं आकर्षित दिसण्यापेक्षा वाईट दिसू लागतात. नेल आर्टसाठी नखं स्वच्छ राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ते जास्त वाढवू नका. त्यांची नियमित छाटणी करा. फाइनरच्या मतदतीने नखांना हवा तसा आकार द्या. जेणेकरुन नखांचे सोंदर्य खूलून दिसेल.
नेलपॉलिश रिमूव्हर वापरा : नवीन नेलपॉलिश लावण्यापूर्वी नेलपॉलिश रिमूव्हरनं नख स्वच्छ करा. यामुळे मागील नेलपॉलिश चिटकून राहत नाही.
नेल आर्ट जास्त काळ टिकविण्यासाठी हे करा : नेल आर्ट लावण्यापूर्वी काही मिनिट ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये नखं भिजवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे नेल आर्ट जास्त काळ टिकून राहातं.
कोमट पाणी : कोमट पाण्यामध्ये साबण मिक्स करा आणि काही काळ यात नखं भिजत ठेवा. नंतर नखं बाहेर काढा आणि कोरड्या कापड्यानं स्वच्छ करा.
लिंबाचा रस : 8 ते 10 मिनिटं लिंबाच्या रसामध्ये नख भिजत ठेवा. यामुळे नखं कडकच नाही, तर ती पिवळी देखील पडत नाही.
बेस कोट : नेलपेंट लावण्यापूर्वी बेस कोट लावणे आवश्यक आहे. हे नेलपेंटवर डाग पडण्यापासून वाचवतं.
डबल कोट : नखं तयार केल्यानंतर दर्जेदार नेलपॉलिश निवडा आणि तुमच्या आवडीची नेल आर्ट लावा. शेवटी, टॉपकोट लावा. येथे काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रथम नेलपॉलिशचा एक पातळ थर लावा आणि तो सुकल्यानंतर, त्याच्यावर दुसरा लेप लावावा. त्यानंतरच नेल आर्ट तयार करा. मात्र, आर्ट लावताना वापरलेले दगड, मणी, कुंदन इत्यादी जोडण्यासाठी फक्त नेल ग्लेनचाच वापर करावा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)