Benefits Of Lemon water With Honey : सकाळी उठल्यावर उपाशी पोटी पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध टाकून पितात. मात्र, या ऐवजी देखील हे प्येय पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेउया, मध आणि लिंबाच्या पाण्याचे उद्भूत परिणाम.
लिंबाचं आणि मधाचं हे पेय भूक नियंत्रित करण्यास मदत करते. एवढेच नाही तर व्हिटॅमिन बी, सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी लिंबू समृद्ध आहे. हे पेय शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकते आणि संसर्ग टाळण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, लिंबाचा सर आणि मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीरात अधिक कोलेजन तयार करण्यास आणि त्वचा उजळ करण्यास मदत करतात.
बहुतांश लोक केवळ वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचं पाणी पितात. परंतु, पोषण तज्ज्ञ राखी चॅटर्जी म्हणतात की, लिंबू-मधाच्या फायद्यांपैकी हा केवळ एकच फायदा आपल्याला माहिती आहे. रिकाम्या पोटी लिंबू आणि मधाचं पाणी पिल्यानं वजन कमी करण्याशिवाय इतरही अनेकही फायदे होतात.
भूक नियंत्रित करते : रिकाम्या पोटी लिंबाचा रस आणि मध पाणी प्यायल्यानं भूक नियंत्रणात राहते. राखी चॅटर्जी सांगतात की, यामुळे तुम्हाला दिवसभर जास्त खाणं टाळता येईल आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.
पचन सुधारतं : लिंबाचं पाणी शरीरातील पाचक एन्झाईम्सचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. हे पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषून घेतं आणि वजन नियंत्रित ठेवते.
रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं: मधामध्ये साखरेपेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यानं, लिंबाचा रस आणि मध मिसळून पाणी पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. मध आणि लिंबाचं मिश्रण रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. हे शरीराला हायड्रेट ठेऊन अन्नाची लालसा कमी करण्यास देखील मदत करते.
चयापचय सुधारतं : मध आणि लिंबाचं पाणी प्यायल्यानं तुमची चयापचय क्रिया वाढते. या पेयामध्ये कॅलरीज बर्न करण्याची विशेष क्षमता देखील आहे.
हायड्रेशन टिकवून ठेवते : वजन कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये मध आणि लिंबाच पाणी पिणे हा तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. हे तुम्हाला तुमची भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
शरीराला डिटॉक्सिफाय करतं : लिंबाचं पाणी रोज मधासोबत प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. हे मुक्त रॅडिकल्स आणि विषारी पदार्थांपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4910284/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)