हैदराबाद- एसी स्फोट कसं टाळावा- राज्यभरात बहुतांश जिल्ह्यात ४० अंश सेल्सियसहून अधिक तापमान आहे. त्यामुळे अनेकजण घराबाहेर न पडता घरात पंखे, कुलर आणि एसीच वापर करत आहेत. विशेषत: एसीसह कुलरचा वापर वाढला आहे. एसी वापरताना निष्काळजी केल्यास एसीचा स्फोट होऊ शकतो, असा तज्ज्ञांनी इशारा दिला.
एसी स्फोटाची काय आहेत कारणे?
- एसी कॉम्प्रेसर प्रमाणाहून अधिक गरम झाल्यास त्याचा स्फोट होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- एसीमधील रेफ्रिजरंट लाइन्समध्ये दाब वाढल्यानं स्फोट होण्याचा धोका असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- चुकीच्या पद्धतीनं केलेली वायरिंग, लूज कनेक्शन, शॉर्ट सर्किट इत्यादींमुळे एसीचा स्फोट होऊ शकतो.
- एसीच्या कूलिंग सिस्टिममध्ये गॅस गळती झाल्यास स्फोट होऊ शकतो.
- एसी जास्त गरम झाल्यास किंवा व्यवस्थित थंड न केल्यास स्फोट होऊ शकतो.
- योग्य देखभाल आणि वेळेवर सर्व्हिस न केल्यास एसीचा स्फोट होऊ शकतो.
- काहीवेळा विद्युत प्रवाहाच्या चढउतारांमुळे एसीमध्ये बिघाड होऊन स्फोट होतो.
एसीचा स्फोट टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा
- घरात नवीन एसी बसवताना अनुभवी टेक्निशयनकडून बसवून घ्यावा.
- एसीमध्ये काही समस्या असल्यास विनाविलंब टेक्निशियनकडून दुरुस्त करून घ्यावा.
- एसीमधील फिल्टर वारंवार स्वच्छ करावेत. असे केल्यानं एसीमध्ये बिघाड होणार नाही.
- एसीमधून गॅस गळती झाल्याचे आढळल्यास ताबडतोब बंद करा. टेक्निशयनकडून त्वरित दुरुस्त करून घ्या.
- विद्युत प्रवाहात चढ-उतार होत असल्यानं चांगले स्टॅबिलायझर वापरावे.
- एसीचा वापर झाल्यानं खोली थंड झाल्यावर अर्ध्या तासासाठी एसी बंद करा.
कुलरमधून विजेचा शॉक लागण्याची असते भीती- कुलरमध्ये एसीसारखा स्फोट होत नाही. मात्र, लोखंडी कुलर असो की प्लास्टिकचा कुलर विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. अर्थिंग कनेक्शन नसेल तर कुलरला स्पर्श होताच विजेचा धक्का बसू शकतो.
काय घ्यावी काळजी- कुलरमधील वीजेचा शॉक टाळण्यासाठी कुलरमध्ये अर्थिंग असणं अत्यंत गरजेचं असते. जास्त व्होल्टेज असलेल्या विद्युत उपकरणांमध्ये तीन पिन प्लग वापरावेत. कुलरमधील पाण्यामुळे बाहेरील आणि आतील भाग ओलसर होतो. त्यातून वीज प्रवाह वाहू शकतो. टेस्टरच्या मदतीनं तुम्ही कुलरमध्ये विद्युत प्रवाह नसल्याची वेळोवेळी खात्री करून घ्या. इलेक्ट्रिशनयकडून कुलरची अर्थिंग आणि वायरिंग योग्य असल्याची खात्री करून घ्या. ओल्या हातांनी, अनवाणी असताना कुलर किंवा स्विचला स्पर्श करू नका. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी स्वीच बंद करा.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलर असो की एसी ही विद्युत उपकरणे युट्युबसारख्या सोशल मीडियातून अर्धवट माहिती घेत दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका. अर्धवट ज्ञानामुळे कुलर अथवा एसी दुरुस्त न झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रिशियन किंवा टेक्निशियनकडून कुलरसह एसीची वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभाल करावी.
हेही वाचा-