Bottle Gourd For Weight Loss : दुधी भोपळ्याच्या भाजीचं नाव ऐकताच अनेक जण नाक मुरडतात. परंतु, न आवडणाऱ्या दुधी भोपळ्याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी, के, ई, पोटॅशिमय, मॅग्नेशियम तसंच लोह मुबलक प्रमाणात आढळत. दुधीच भोपळ्याचा रस प्यायल्यास बेली फॅट तसंच शरीरातील इतर फॅट कमी करण्यास मदत होते. तसंच हाडं मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. त्याचबरोबर तणाव व्यवस्थापण करण्यासाठी देखील दुधी महत्त्वाची भूमिका बजावते. दुधी सर्व पोषक तत्वांचे शक्तीस्थान आहे, असं आहारतज्ञ आणि वजन व्यवस्थापन तज्ञ डॉ. प्रत्यक्षा भारद्वाज यांचं मत आहे. जर तुम्हाला दुधी भोपळा आवडत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा याचा रस पिऊ शकता.

- दुधीच्या रसाचे फायदे
श्वसन रोग: दुधी भोपळा हा लघवीचे प्रमाण वाढवणारा तसंच कार्डिओ टॉनिक पदार्थ आहे. यामुळे अल्सर श्वसनासंबंधित विकार, वेदना आदींवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

युरिक अॅसिड: शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले असल्यास सूज येवू शकते. परिणामी गुडघेदुखीचा त्रास होतो. या समस्येपासून मुक्तता हवी असल्यास दुधी भोपळा उपयुक्त आहे. कारण यात व्हिटॅमिन सी आणि बी, लोक तसंच पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. यामुळे सकाळी उपाशी पोटी भोपळ्याचा रस प्यायल्यास युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होवू शकते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त: भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी, के, ई, पोटॅशिमय, मॅग्नेशियम तंसच लोह मुबलक प्रमाणात आढळतात. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. तसंच यात फॅटचे प्रमाण कमी आहे त्याचबरोबर फायबर मुबलक प्रमाणात आहे यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसंच शरीराला उर्जा वाढवण्यासाठी हे उत्तम पेय आहे. याच्या सेवनानं मेटाबॉलिज्म वेगात होतो. परिणामी वेगानं शरीरातील चरबी घटवण्यास मदत होते.
- शरीरातील घाण काढण्यासाठी चांगलं: दुधीचा रस शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी भोपळ्याचा रस सर्वोत्तम आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात. याकरिता एक ग्लास भोपळ्याचा रस सकाळी रिकम्या पोटी प्यावं.
- रक्तदाब नियंत्रण: दुधी भोपळ्यातील पौष्टिक घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करतात. यातील व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स थ्रोमबॉक्सेन नावाचं घटक रक्त पातळ करतो. यामुळे रक्तदाबाची समस्या टाळता येवू शकते. रक्तदाब नियंत्रित ठेवायचं असल्यास भोपळ्याची भाजी किंवा रसाचं नियमित सेवन करावं.
- पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर: कॉन्स्टिपेशन समस्या असलेल्यासाठी हे गुणकारी आहे. पोट साफ न होणे तसंच कठीण स्वरूपात शौचास होणे यासारख्या समस्या असलेल्या व्यक्तींनी भोपळ्याचं रस प्यायाल्यास त्यांना फायदा होवू शकतो. यातील फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
- दुधी भोपळ्याचा रस बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम दुधी चिरून घ्या. चिरलेल्या दुधीचे तुकडे ब्लेंडरनं व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. दुधी भोपळ्याचा रस तयार आहे. परंतु आतड्या किंवा पोटासंबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी कच्च्या भोपळ्याचं रस पिऊ नये. त्यांनी सर्वप्रथम दुधीवरी साल काढून चिरून घ्यावी. कापलेला भोपळा कुकुरमध्ये घाला आणि त्यात थोडं पाणी टाकून शिजवा. शिजलेली दुधी मिक्सरच्या भांड्यात घाला आणि बारीक करून घ्या. तयार झालेल्या रसात जिरेपूड, आलं, पुदिन्याची पानं, लिंबाच रस, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घाला आणि प्या. थंड हवं असेल तर त्यात 2-3 बर्फाचे तुकडे घालून प्या.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ