ETV Bharat / entertainment

शत्रुघ्न सिन्हांच्या खोलीत शिरताना भीतीनं थरथरत होता झहीर इक्बाल, मुलाखतीत शेअर केला प्रपोजचा किस्सा - Zaheer Iqbal - ZAHEER IQBAL

Zaheer Iqbal news: सात वर्षांच्या डेटिंगनंतर झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांनी एका समारंभात लग्न केलं आणि त्यानंतर मोठ्या थाटामाटात लग्न केलं. एकत्र राहण्याचं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी, झहीरनं सोनाक्षीचे वडील, शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे परवानगी मागितली होती. सोनाक्षीच्या आयुष्यातील या दोन महत्त्वाच्या व्यक्तींमधील संवाद कसा घडला हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Zaheer Iqbal news
झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा (Zaheer Iqbal spills on meeting Shatrughan Sinha (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 4:13 PM IST

मुंबई - Zaheer Iqbal News : झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाचं लग्न वाजत गाजत पार पडलं. त्यांचा प्रेमविवाह बऱ्याच चर्चेचा विषय ठरला होता. या लग्नाला सोनाक्षीच्या घरातून विरोध असल्याचा सूरही ऐकायला मिळाला होता. मात्र झहीर इक्बालनं शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर लग्नाला संमती कशी मिळवली याची आठवण सांगितली.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, झहीरनं उघड केलं की तो त्याच्या भावी सासऱ्याच्या पहिल्या संभाषणादरम्यान चिंताग्रस्त होता आणि तो भीतीनं थरथरत होता. झहीरनं कबूल केलं की परवानगी मागताना त्यानं अनवधानानं सांगितलं की त्याच्याकडे प्रपोज करण्यासाठी आधीच अंगठी होती.

"जेव्हा मला प्रपोज करण्यासाठी परवानगी घ्यायला जावं लागलं, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मी थरथरत बोलत आहे आणि मला वाटलं की ते मला म्हणतील 'खामोश'. पण तसं काही घडलं नाही, ते खूप प्रेमळपणे वागले", असं झहीरने एका वेबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत शेअर केलं.

त्या संभाषणाची आठवण करून देताना झहीर म्हणाला, "मी स्तब्ध झालो आणि त्यांना म्हणालो, 'अंकल, वो सोना ने आपके बताया होगा, के हम ...' त्यांनी उत्तर दिलं, 'हाँ, बताया तो था...' मी मग म्हणालो, 'अंकल, मैं सोच रहा था, मैं थोडा, थोडा नहीं पुरा प्रपोज कर देता हूं.' यावर त्यांचा भाव होता, "अच्छा व्हेरी गुड, व्हेरी गुड."

मी म्हणालो, "अंकल, माझ्या विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लिज विचारा. त्यानंतर आमच्यात अनेक विषयावर तासभर छान चर्चा झाली. पण मी त्यांच्या खोलीत जेव्हा गेलो होतो तेव्हा मी खूप घाबरलो होतो. जर त्यांनी नकार दिला तर तर मग आपण काय करायचं? अनावधानानं मी त्यांना सांगितलं की, मी बरोबर अंगठी घेऊन आलोय, त्यामुळं ते कदाचीत नकार देणार नाहीत," असं झहीर म्हणाला.

सोनाक्षी आणि झहीरने लग्नाआधी सात वर्षे डेट केलं होतं. अखेर 23 जून रोजी त्यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला.

हेही वाचा -

  1. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल मुंबईहून अज्ञातस्थळी हनिमूनसाठी रवाना - SONAKSHI SINHA AND ZAHEER IQBAL
  2. सोनाक्षी सिन्हानं पोस्ट केला तिच्या लग्नातील सलमान खान, रेखासह सेलेब्रिटींचा व्हिडिओ - Sonakshi Sinha wedding
  3. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं हनीमूनमधील केले सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर - Sonakshi sinha and zaheer iqbal

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.