मुंबई - Sidharth Malhotra Economy Class : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याचा आगामी चित्रपट 'योद्धा'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'योद्धा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ आता वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत आहे. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसत आहे. सिद्धार्थचा हा व्हिडिओ पापाराझीनं त्याच्या पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ मास्क घातलेल्या त्याच्या टीमबरोबर दिसत आहे. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत नसल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. एका प्रवाशानं मास्कमध्येही त्याला ओळखलं आहे. या प्रवाशानं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बनवून अपलोड केला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा फ्लाईटमधील व्हिडिओ व्हायरल : 'योद्धा' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राबरोबर साऊथ अभिनेत्री राशि खन्ना आणि दिशा पटानी असणार आहेत. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ ॲक्शन करताना दिसेल. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित आणि हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान निर्मित, हा चित्रपट भारतीय सैनिकांच्या आयुष्यावर आधारित आहे. 'योद्धा' चित्रपटासाठी सिद्धार्थनं खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. दरम्यान 'योद्धा' चित्रपट 15 मार्च 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. सिद्धार्थच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं, ''सिद्धार्थ हा नेहमीच सुंदर दिसतो, मी त्याचा खूप मोठा चाहता आहे.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, '' किती छान मी पण या फ्लाईटमध्ये असती तर... माझी संधी गेली आता.'' या व्हिडिओवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
सिद्धार्थ मल्होत्राचा वर्क फ्रंट : 'योद्धा'नंतर, सिद्धार्थ मॅडॉक प्रोडक्शन स्पायडरबरोबर काम करणार आहे, ज्यामध्ये तो अभिनेत्री जान्हवी कपूर स्क्रिन शेअर करताना दिसेल. यानंतर जंगली पिक्चर्ससाठी मेघना गुलजारबरोबर खऱ्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये तो असणार असल्याची, बातमी आहे.
हेही वाचा :
- Madhusudan Kalelkar : मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सव, रंगकर्मी आणि रसिकांसाठी पर्वणी
- SRK teaches Ed Sheeran : शाहरुख खानने गायक एड शीरनला शिकवली त्याची आयकॉनिक सिग्नेचर पोज, पाहा व्हिडिओ
- Bastar the naxal story : 'बस्तर-द नक्सल स्टोरी' स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दोनदा वीज खंडित झाल्यानं जेएनयूमध्ये गोंधळ