मुंबई - Cbse board result : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10वी आणि 12वी परीक्षेच्या आगामी निकालांबाबत पसरलेल्या अफवांना पूर्णविराम देत बोर्डानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीबीएसई बोर्डानं आपल्या वेबसाइटवर निकालांबद्दलची माहिती दिली आहे की, "10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल 20 मे नंतर जाहीर केले जाऊ शकतात. पालक व विद्यार्थ्यांनी दररोज येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये. तसेच 20 मे पूर्वी निकालाबाबत कोणत्याही संभ्रमात पडू नये." मात्र तरी देखील सीबीएसईच्या निकालाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या वेबसाइटवर दिली गेली माहिती : दरम्यान 10वी आणि 12वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 16 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून मार्च महिन्यापर्यंत चालली. यानंतर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी, सीबीएसईनं उत्तरपत्रिकांचेही त्वरीत मूल्यांकन केलं होतं. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या निकालाच्या खोट्या बातम्या समोर येऊ लागल्या. यानंतर निकालाबाबत अफवा पसरवू लागल्या. सीबीएसई बोर्डाची वेबसाइट लोकांनी तपासली असता त्यांना 20 मे पूर्वी निकालाबाबत अशी कोणतीही तारीख किंवा माहिती सापडली नाही. सीबीएसई बोर्डाच्या वेबसाइटवर आता निकालाबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी निकालाबाबत काही महत्वाची माहिती दिली आहे.
परीक्षेचा निकाल 20 मे नंतरच जाहीर होऊ शकतो : पालक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सीबीएसई बोर्डानं आता आपल्या वेबसाइटवर स्पष्ट केलं आहे की, परीक्षेचा निकाल 20 मे नंतरच जाहीर केला जाऊ शकतो. मात्र, बोर्डाकडून अद्याप कोणतीही निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत आणि 10वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. सीबीएसई बोर्डाच्या 12वी आणि 10वीच्या परीक्षेला देशभरातून 39 लाख विद्यार्थी बसले होते. आता काही दिवसात या परीक्षांचा निकाल समोर येणार आहेत.
हेही वाचा :