ETV Bharat / entertainment

Baaghi 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'बागी' फ्रेंचाइजीचा चौथा भाग येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Baaghi 4

Baaghi 4 : टायगर श्रॉफचा 'बागी' फ्रेंचाइजीचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता टायगरनं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात 'बागी'च्या तिन्ही चित्रपटामधील सीन्स दिसत आहेत.

Baaghi 4
बागी 4
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 10:52 AM IST

मुंबई - Baaghi 4 : अभिनेता टायगर श्रॉफनं त्याच्या अ‍ॅक्शन फ्रेंचाइजी 'बागी'च्या चौथ्या भागाच्याबातमीला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि वर्दा खान नाडियादवाला करत आहेत. 'बागी' आणि 'बागी 2' च्या यशाने टायगर श्रॉफचं चित्रपटसृष्टीत नाव झालं होतं. अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या या अ‍ॅक्शन फ्रँचायझीनं आतापर्यंत तीन चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज केले आहेत. टायगर श्रॉफ स्टारर 'बागी'चा चौथा भाग 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टायगरनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याचा 'बागी' ते 'बागी 3' या चित्रपटामधील ॲक्शन प्रवास दाखवण्यात आला आहे.

टायगर श्रॉफ 'बागी 4' येणार प्रेक्षकांच्या भेटीला : या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ''माझ्या मनाच्या सर्वात जवळची फ्रेंचाइजी, सर्वात आव्हानात्मक देखील आहे.'' या व्हिडिओमध्ये तिन्ही चित्रपटांमधील टायगरचे बेस्ट सीन्स दाखविण्यात आले आहेत. व्हिडिओत टायगरनं फ्लाइंग किक, जंप आणि इतर स्टंट्ससह मार्शल आर्ट्स कौशल्य देखील प्रदर्शित केले आहे. या व्हिडिओमध्ये टायगरचे सिक्स पॅक आणि बायसेप्स दिसत आहेत. आता हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. 'बागी' चित्रपटाचे तिन्ही भाग चाहत्यांना खूप आवडले आहेत.

'बागी 4'साठी चाहते उत्सुक : साजिद नाडियादवाला प्रेक्षकांसाठी 'बागी' फ्रेंचाइजीतील नवा अध्याय घेऊन येत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले, ''बागी 4 सुपरहिट' चित्रपट असणार आहे, मी या चित्रपटाची खूप आतुरतेनं वाट पाहत आहे.'' दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, ''भारताचा नंबर 1 ॲक्शन हिरो' टायगर आहे, तो प्रत्येक चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन करतो.'' आणखी एकानं लिहिलं, 'हे खरोखर सुंदर आहे, मी 'बागी 4'ची वाट पाहत आहे.' याशिवाय काहीजण दिशा पटानी आणि श्रद्धा कपूर या दोघी 'बागी 4'मध्ये असायला हव्यात हे बोलताना दिसत आहेत. दरम्यान टायगर वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'बडे मियाँ छोटे मियाँ' , 'मिशन ईगल' आणि 'रॅम्बो' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. मनोज बाजपेयी अभिनीत 'भैय्या जी'चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
  2. Magadheera to Rerelease : राम चरणचा ब्लॉकबस्टर 'मगधीरा' त्याच्या 39 व्या वाढदिवसाच्या आधी थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित
  3. Priyanka Chopra Visit ayodhya : देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीबरोबर अयोध्येत ; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.