ETV Bharat / entertainment

पापाराझींवर भडकली रिया चक्रवर्ती, गमावला संयम - रिया चक्रवर्ती पापाराझींवर चिडली

Rhea Chakraborty: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रिया चक्रवर्ती नुकतीच एका पार्टीतून बाहेर पडताना दिसली. यावेळी तिला पापाराझीनं घेरलं होत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rhea Chakraborty
रिया चक्रवर्ती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 6:09 PM IST

मुंबई - Rhea Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्ती 11 फेब्रुवारीच्या रात्री मुंबईत एका पार्टीतून बाहेर येत होती. यावेळी तिला पापाराझीनं घेरलं. पापाराझी तिचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक करू लागले. दरम्यान, रियानं त्यावेळी पापाराझीला आरडाओरडा करण्यास मनाई केली. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रिया पापाराझींला फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. क्रिम कलर को-ऑर्डर सेटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. यानंतर फोटोग्राफर्सचा गोंधळ पाहून ती आपला संयम गमावून बसते आणि त्यांना म्हणते, ''जर तुम्ही ओरडलात तर मी तुमचे ऐकू शकणार नाही. यानंतर फोटोग्राफर्स तिला म्हणतात की इथे लोक आहेत ना म्हणून गोंधळ होत आहे.

रिया चक्रवर्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : यावर रिया म्हणते, ''कुठे इथे लोक आहेत.'' रियाच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करू तिच्या लूकबद्दल अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. 2020 मध्ये बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला मोठा धक्का बसला होता. यानंतर तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. यानंतर तिला तुरुंगामध्ये अनेक दिवस राहावे लागले होते. यानंतर याबद्दल बोलताना रियानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ''मला वाटत नाही की माझ्या जखमा कधी भरून येईल. मला त्याची आठवण येते आणि त्याशिवाय माझे उर्वरित आयुष्य जगणे खूप कठीण आहे. पण मला पुढे जावे लागेल, माझ्या नेहमी तो मनात राहिल.''

रिया चक्रवर्तीची मुलाखत : रिया पुढं सांगितलं, 'पुढे जाणे ही एक गोष्ट आहे जी आपल्याला माणूस बनवते. हे आपल्याला आपले जीवन जगण्यास मदत करते, आपल्या जीवनात काहीही झाले तरी चालत राहण्यास मदत करते, मग ती कोणतीही घटना असो. माझ्या आयुष्यातील तुरुंगामधील काळ खूप कठीण होता. आता मी खरोखर पुढे जाण्यास उत्सुक आहे. पुन्हा सामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे, जसे की फिरायला जाणे, केस कापण्यासाठी सलूनमध्ये जाणे, माझ्या पालकांसोबत जेवायला जाणे. मी नशीबवान आहे की मी पुन्हा साध्या जीवनात परतले आहे. रियानं काही काळापूर्वी 'रोडीज' शोला जज केलं होतं.

हेही वाचा :

  1. सलमान खान आणि निर्माता साजिद नाडियाडवाला ब्लॉकबस्टर ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र
  2. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हायरल
  3. साऊथ अभिनेता मामूट्टी स्टारर मल्याळम चित्रपट 'ब्रमायुगम'चा ट्रेलर प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.