हैदराबाद- Rashmika and Vijay : निर्माता दिल राजूचा पुतण्या, अभिनेता आशिष रेड्डी याचे 14 फेब्रुवारी रोजी अद्विता रेड्डीसोबत लग्न झाले. त्याच्या कुटुंबीयांनी हैदराबादमध्ये त्यांच्या प्रियजनांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. 23 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या भव्य लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तेलुगू चित्रपट उद्योगातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. या स्टार स्टडेड रिसेप्शन पार्टीमध्ये विजय देवरकोंडा, रश्मिका मंदान्ना, राम पोथिनेनी, नागार्जुन आणि इतरांनी भाग घेतला होता.
आशिष आणि अद्विताच्या रिसेप्शनमध्ये रश्मिका मंदान्नाने धमाकेदार प्रवेश केला. ती एक ऑफ-व्हाईट साडीमध्ये शोभून दिसत होती. काही क्षणांनंतर, स्टायलिश ऑल-ब्लॅक पारंपारिक पोशाख परिधान केलेला विजय देवरकोंडा कार्यक्रमासाठी पोहोचला. नवविवाहित जोडप्यासह फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतर रश्मिका मंदान्नाने अद्विताशी मैत्रीपूर्ण संवाद साधला. त्यानंतर तिने नवविवाहित जोडप्याला तिच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत फोटो काढला.
कामाच्या आघाडीवर विजय देवरकोंडा मृणाल ठाकूर बरोबर परशुराम पेटलाच्या आगामी चित्रपट 'फॅमिली स्टार'मध्ये काम करत आहे, हा चित्रपट पुढील महिन्यात 5 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात अॅक्शन आणि कॉमेडीचे मिश्रण पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय, विजय गौतम तिन्ननुरी यांच्या चित्रपटात प्रथमच तो पोलिसाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक VD12 ठेवण्यात आले आहे.
दुसरीकडे, रश्मिका मंदान्ना सध्या सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या चित्रीकरणात गुंतली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फासिल, जगपती बाबू आणि प्रकाश राज यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे. 'पुष्पा' चित्रपटाच्या पहिल्या भागात कथानक जिथे संपले होते तिथून पुढील भागाच्या कथेला प्रारंभ होणार आहे.
'पुष्पा 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, रश्मिकाचे आणखी तीन चित्रपट आहेत - दीकशिथ शेट्टी अभिनीत 'द गर्लफ्रेंड', देव मोहनची भूमिका असलेला 'इंद्रधनुष्य' आणि 'VD12' मध्ये ती विजय देवराकोंडासह झळकणार आहे.
हेही वाचा -