ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया 3' ट्रेलरमध्ये पाहा मंजुलिकाचा थरार आणि रुहबाबाचा निकराचा मुकाबला - BHOOL BHULAIYAA 3 TRAILER

Bhool Bhulaiyaa 3 Trailer : 'भूल भुलैया 3' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मंजुलिकाचा थरार आणि रुहबाबानं तिच्याशी केलेला सामना रंजक ठरणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 9, 2024, 4:01 PM IST

मुंबई - 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला. कार्तिक आर्यन अभिनीत, हा चित्रपट त्याच्या मागील चित्रपटाप्रमाणेच विनोद, सस्पेन्स, एकत्र धमाका आहे. भुल भुलैया फ्रँचायझीचा तिसरा भाग म्हणून एक प्रेक्षकांना एक नवीन पण नॉस्टॅल्जिक अनुभव देणारा असल्याचं ट्रेलरवरुन दिसतंय.

ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन हा रुहान रंधावा अर्थातच रुह बाबा म्हणून मनोरंजन करत आहे. या वेळी, त्याला एका अधिक भयंकर आणि शक्तिशाली अस्तित्वाचा सामना करावा लागत आहे आणि चित्रपटातील वातावरण सुरुवातीपासूनच सस्पेन्सने भारलेले आहे. भितीदायक हवेली, अंधुक प्रकाशाने उजळलेले कॉरिडॉर आणि अंधुक आकृत्यांचे मिश्रण असलेली दृष्ये कथेची उत्कंठा वाढवतात. झापटून टाकणारं पार्श्वसंगीत आणि स्लॅपस्टिक कॉमेडीचे मिश्रण यात पाहायला मिळतंय.

'भुल भुलैया 2' च्या जबरदस्त यशानंतर 'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलंय. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी टी सिरीज आणि सिने 1 स्टुडिओच्या बॅनरखाली केली आहे. कार्तिक आर्यन याच्यासह, या चित्रपटात विद्या बालन, तृप्ती दिमरी, माधुरी दीक्षित आणि राजपाल यादव यांचा समावेश आहे. अक्षय कुमार छोट्या भूमिकेत असल्याच्या चर्चा पसरत आहेत, मात्र अक्षयनं हे दावे फेटाळले आहेत. 'भूल भुलैया 3' 1 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे आणि हॉरर, कॉमेडी चित्रपट थ्रिल्सच्या मिश्रणाने प्रेक्षकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे.

'भुल भुलैया 2' चित्रपटाच्या ट्रेलर जयपूरमध्ये लॉन्च करण्यात आला. शहरातील राज मंदिर या प्रतिष्ठीत सिनेमा थिएटरमध्ये ट्रेलर लॉन्च करण्यासाठी कार्तिक आर्यन, भूषण कुमारसह सिनेमाची स्टार कास्ट हजर होती. जयपूरमधील कार्तिकच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाला भरपूर गर्दी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.