ETV Bharat / entertainment

रियल मैड्रिड यूईएफए चॅम्पियन्स लीग जिंकल्यानंतर कार्तिक आर्यननं आनंदानं स्टेडियममध्ये मारल्या उड्या - Kartik Aaryan - KARTIK AARYAN

Kartik Aaryan: कार्तिक आर्यन नुकताच लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर यूईएफए चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी गेला होता. इथे रियल मैड्रिडनं विजयी मिळवला. यानंतर कार्तिकनं आनंदानं स्टेडियममध्ये उड्या मारल्या.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 10:42 AM IST

मुंबई - Kartik Aaryan : नुकत्याच झालेल्या UEFA (युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन) चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात रियल मैड्रिडनं बोरुसिया डॉर्टमुंडला 2-0नं हरवलं आहे. हा सामना पाहण्यासाठी कार्तिक आर्यननं देखील लार्जर दॅन लाईफ बॉल गेममध्ये सहभाग घेतला होता. रियल मैड्रिडच्या विजयानंतर कार्तिकनं आनंदानं उड्या मारल्या. लंडन येथील वेम्बली स्टेडियममधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, कार्तिक लॉस ब्लँकोसला चीअर करताना दिसला. रियल मैड्रिडनं 15व्यांदा चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. व्हिडिओ शेअर करताना कार्तिकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "चॅम्पियन्ससह एक दिवस." याशिवाय कार्तिकनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

कार्तिक आर्यनचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल : यातील एका व्हिडिओमध्ये कार्तिकनं रियल मैड्रिडची जर्सी दाखवण्यासाठी त्याच्या शर्टची बटणं उघडली. तसेच कार्तिकनं दिग्गज लुईस फिगोबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. लुईस फिगो सध्या यूईएफएचे ॲम्बॅसेडर आहे. एका फोटोमध्ये कार्तिकला फिगो बॉल देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कार्तिकनं लिहिलं, "हा बॉल तर मीच ठेवीन फिगो'. 2 जून रोजी कार्तिकनं स्पॅनिश फुटबॉलपटू लुईस गार्सियाबरोबर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो यूईएफए फायनलच्या निकालाची भविष्यवाणी करताना दिसत आहे. रियल मैड्रिड जिंकेल असं त्यांन यामध्ये म्हटलं होतं. यानंतर लुईस गार्सियानं विचार केला होता की, रियल मैड्रिड हा बोरुसिया डॉर्टमुंडला2-1नं पराभूत करेल.

वर्कफ्रंट : कार्तिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तो शेवटी 'सत्य प्रेम की' या चित्रपटामध्ये कियारा अडवाणीबरोबर दिसला होता. आता पुढं तो 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 14 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात भुवन अरोरा, यशपाल शर्मा, अनिरुद्ध दवे आणि भाग्यश्री बोरसे यांच्याही भूमिका आहेत. कबीर आणि साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहेत. याशिवाय तो 'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालनबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोण फॅमिली डिनर डेटवर आईबरोबर झाली स्पॉट, दिसली चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक - Pregnant Deepika Padukone
  2. पनवेल फार्महाऊसबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी सलमान खानच्या फॅनगर्लला घेतलं पोलिसांनी ताब्यात - Salman Khan fan girl
  3. कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालनं सोनाक्षी सिन्हाला दिल्या वाढदिवसाच्या शुुभेच्छा, केली पोस्ट शेअर - sonakshi sinha birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.