ETV Bharat / entertainment

'छावा' स्टार्स विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना केला रॅम्प वॉक, व्हिडिओ व्हायरल - Vicky Kaushal and Rashmika Mandanna - VICKY KAUSHAL AND RASHMIKA MANDANNA

Vicky Kaushal and Rashmika Mandanna : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना हे 'छावा' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याआधी ही जोडी रॅम्पवर झळकली. आता त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Vicky Kaushal and Rashmika Mandanna
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना (विक्की-रश्मिका (IMAGE- ANI VIDEO))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 12:40 PM IST

नवी दिल्ली - Vicky Kaushal and Rashmika Mandanna: अभिनेता विकी कौशल आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची जोडी चित्रपटात येण्यापूर्वी रॅम्पवर दिसली आहे. विकी आणि रश्मिका 'छावा' या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे. विकी आणि रश्मिकाचे चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान विकी आणि रश्मिकाचा प्रसन्न वावर 'इंडियन कॉउचर वीक 2024' च्या ग्रँड फिनालेमध्ये दिसला. 31 जुलै रोजी दिल्लीत या फॅशन वीकचा समारोप झाला. विकी आणि रश्मिकाच्या जोडीला यावेळी भरभरून प्रेम मिळालं. विकीनं यावेळी रश्मिकाचं कौतुक करत तिला 'क्वीन' देखील म्हटलं. यानंतर रश्मिकानं विकीजवळ कृतज्ञताही व्यक्त केली.

विकी आणि रश्मिकाची ब्लॉकबस्टर जोडी : रॅम्पवर विकी आणि रश्मिकाचा वेडिंग लूक हा खूप आकर्षक होता. विकीनं क्रीम रंगाच्या शेरवानीचा सेट आणि रश्मिकानं सुंदर लेहेंगा परिधान केला होता. विकी आणि रश्मिकाच्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका व्हिडिओवर एका चाहत्यानं या जोडीला ब्लॉकबस्टर जोडी असल्याचं म्हटलं आहे. आणखी दुसऱ्या एका चाहत्यानं या व्हिडिओच्या कमेंट विभागात लिहिलं की, "विकी आणि रश्मिका एकत्र खूप छान दिसतात." याशिवाय काहीजण या जोडीवर हार्ट आणि फायर इमोजीचा वर्षाव करताना दिसत आहेत.

'छावा' चित्रपटाबद्दल : माडोक फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा विकीचा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी विकीनं जिममध्ये खूप घाम गाळला आहे. रश्मिका मंदान्ना या चित्रपटात संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय. विकी आणि रश्मिका यांच्यासह या चित्रपटामध्ये अक्षय खन्ना, दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 रिलीज होणार आहे, त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिस टक्कर होईल.

हेही वाचा :

'तौबा तौबा' डान्स रीलला 58 मिलियन मिळाले व्ह्यूज, विकी कौशलनं केलं कौतुक - tauba tauba dance

'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण, सेटवरील सलमान खानसह रश्मिका मंदान्नाचे फोटो व्हायरल - SALMAN KHAN RASHMIKA MANDANNA

वायनाड भूस्खलन आणि हावडा-मुंबई ट्रेन अपघातवर चित्रपटसृष्टीतील स्टार्सनं केलं दु:ख व्यक्त - Celebs React on Wayanad Landslide

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.