ETV Bharat / entertainment

विव्हियन डिसेनाला 8 स्पर्धक नॉमिनेट करण्याची शक्ती, दोन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळं बिग बॉसमध्ये ट्विस्ट - BIGG BOSS 18 WILD CARD ENTRY

'बिग बॉस 18' शोमध्ये दोन नवीन स्पर्धकांनी एन्ट्री केली केला. दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर या दोघांनी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे.

Bigg Boss 18 Wild Card Entry
बिग बॉस 18 वाईल्ड कार्ड एन्ट्री ((Bigg Boss Poster)))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 4, 2024, 10:18 AM IST

मुंबई - 'बिग बॉस'च्या घरात राहणाऱ्या सदस्यांमधील चुरस दिवसेंदिवस वाढच चालली आहे. 'बिग बॉस 18' मध्ये काल रात्री शोमध्ये दोन नवीन स्पर्धकांनी एन्ट्री केली केला. दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर या दोघांनीही वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आणि घरातील तापमान वाढवलं. सध्या बिग बॉसमध्ये टाईम गॉडची जबाबदारी असलेल्या विव्हियन डिसेना यानंही आपल्या खेळाचे पत्ते उगड करायला सुरुवात केली आहे. स्वतः पक्षपाती पद्धतीनं वागत असल्याचं त्यानं आगामी एपिसोडमध्ये त्याच्या कुटुंबियांसमोर मान्य केलं आहे. बिग बॉसनं त्याला नॉमिनेशनासाठी पॉवर दिली असल्यामुळं त्याची ताकद खूप वाढली आहे आणि नॉमिनेशन टास्क खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.

बिग बॉसनं विव्हियनला दिली मोठी शक्ती - बिग बॉस 18 शी संबंधित अपडेट्स देणाऱ्या सोशल मीडिया साइटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसनं नॉमिनेशनपूर्वी टाइम गॉड व्हिव्हियन डीसेनाला एक मोठी ताकद दिली आहे. या अंतर्गत आता विव्हियनकडे घरातील कोणत्याही 8 सदस्यांना एकत्र नॉमिनेट करण्याचा अधिकार असेल.

प्रोमोमध्ये दिसतंय की, टाईम गॉड विव्हियनला सांगतो की तो थेट 8 सदस्यांना बेदखल करण्यासाठी नामांकित करेल. हे ऐकून घरातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर विव्हियन आधी तुरुंगात असलेल्या श्रुतिका अर्जुनला लक्ष्य करतो. तो तिला थेट पॉइंट टू पॉइंट बोलायला सांगतो. यानंतर तो करणवीर मेहराला नॉमिनेट करण्यामागचे कारण सांगतो.

एकूणच, बिग बॉसमधील एका ट्विस्टने सर्व घरातील सदस्यांना खूप त्रास दिला आहे. साहजिकच विव्हियन डिसेना यांना नॉमिनेशनची ताकद मिळाली असल्यामुळं तो आधी श्रुतिका अर्जुन, करणवीर मेहरा, अरफीन खान, सारा अरफीन खान, रजत दलाल, तजिंदर पाल सिंग बग्गा, दिग्विजय सिंग राठी आणि चाहत पांडे यांना टार्गेट करू शकतो. आता आगामी एपिसोडमध्ये टाईम गॉड कोणत्या 8 हाउसमेट्सना नॉमिनेट करतो हे पाहणे रंजक ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.