ETV Bharat / entertainment

विजयादशमीच्या दिवशी चिरंजीवी स्टारर 'विश्वंभर'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ - VISHWAMBHARA TEASER

साऊथचा मेगास्टार चिरंजीवीनं विजयादशमीच्या मुहूर्तावर त्याच्या चाहत्यांना भेट दिलीय. त्याच्या आगामी 'विश्वंभर' या चित्रपटाचा शानदार टीझर रिलीज झालाय.

vishwambhara teaser
विश्वंभर टीझर ('विश्वम्भर'चा पोस्टर (Twitter))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 12, 2024, 4:15 PM IST

Updated : Oct 12, 2024, 5:10 PM IST

मुंबई : साऊथचा मेगास्टार चिरंजीवीनं विजयादशमीच्या मुहूर्तावर त्याच्या चाहत्यांना मोठी भेट दिलीय. त्यानं आज 12 ऑक्टोबरला त्याच्या आगामी ॲक्शन चित्रपट 'विश्वंभर'चा दमदार टीझर रिलीज केलाय. शेअर केलेल्या टीझरमध्ये एमएम कीरावानीचे शक्तिशाली व्हीएफएक्स आणि पार्श्वसंगीत आहे. 'विश्वंभर' टीझरच्या सुरुवातीला चिरंजीवीच्या एन्ट्रीनं चाहत्यांची मनं जिंकलीत. 'विश्वंभर' चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप कमाई करेल, असं त्याच्या टीझरवरून दिसून येतंय. दरम्यान, शनिवारी चिरंजीवीनं त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर आगामी ॲक्शन ड्रामा 'विश्वंभर'चं टीझर पोस्टर पोस्ट केलंय.

'विश्वंभर' चित्रपटाचं बजेट : या पोस्टमध्ये चिरंजीवीनं चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'विश्वंभर' थरथरते, जग डगमगते, तारे थरथर कापतात, जेव्हा असा एक माणूस येतो. ' 'विश्वंभर' टीमला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देत 'मेगा मास बियॉन्ड द युनिव्हर्स,' असं त्यांनी म्हटलं. 'विश्वंभर' चित्रपटाचा टीझर खूपच आकर्षक आहे. हा चित्रपट ब्रह्मांडामध्ये लपलेल्या एका नवीन दुनियेत घेऊन जातो. पौराणिक प्राणी आणि मनमोहक दृश्यांनी परिपूर्ण असलेला हा टीझर चाहत्यांना खूप आवडतोय. 'विश्वंभर'चा टीझर हॉलिवूड चित्रपटांची आठवण करून देणारा आहे. 'विश्वंभर' चित्रपटाची निर्मिती 100 कोटीच्या बजेटमध्ये झालीय.

'विश्वंभर' चित्रपटाचा टीझर : टीझरमध्ये चिरंजीवी त्याच्या अलौकिक शक्तीनं राक्षसाचा वध करताना दिसत आहे. टीझरवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, 'विश्वंभर' हा एक विलक्षण चित्रपट असणार आहे, यात पौराणिक दृश्य दाखविण्यात आलीत. या चित्रपटामध्ये काल्पनिक विश्वाला जिवंत करण्यात व्हीएफएक्स (VFX) महत्त्वाची भूमिका बजावेल. 'विश्वंभर' मध्ये चिरंजीवीबरोबर त्रिशा कृष्णनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय मीनाक्षी चौधरी, कुणाल कपूर आणि आशिका रंगनाथ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. मेगास्टार चिरंजीवीचा काल्पनिक ॲक्शन ड्रामा 'विश्वंभर' 10 जानेवारी 2025 रिलीज होणार आहे. 'विश्वंभर' चित्रपटाचं दिग्दर्शन मल्लिदी वसिष्ठ यांनी केलंय. या चित्रपटामध्ये चिरंजीवी अ‍ॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. मेगास्टार चिरंजीवी यांना सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, आमिर खानच्या हस्ते झाला सन्मान - Megastar Chiranjeevi
  2. दाक्षिणात्य अभिनेत्यांचा दानशुरपणा! चिरंजीवीसह महेश बाबूकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची देणगी - flood relief in telangana and ap
  3. बॉलिवूडसह साऊथ सेलिब्रिटींनी साजरा केला स्वातंत्र्य दिन, चाहत्यांना सोशल मीडियातून दिल्या शुभेच्छा - Independence Day celebrity wishes

Last Updated : Oct 12, 2024, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.