ETV Bharat / entertainment

आदित्य नारायणनं लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान चाहत्याचा फोन हिसकावून दिला फेकून - आदित्य नारायणचा लाइव्ह कॉन्सर्ट

Aditya Narayan Viral Video : उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान आदित्यनं एका चाहत्याचा फोन हिसकावून फेकून दिला आहे. यानंतर त्याला सोशल मीडियावर काही यूजर्स ट्रोल करत आहेत.

Aditya Narayan Viral Video
आदित्य नारायणचा व्हायरल व्हिडिओ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 12:32 PM IST

मुंबई - Aditya Narayan Viral Video : हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक उदित नारायण यांचा गायक आणि अभिनेता मुलगा आदित्य नारायण त्याच्या सार्वजनिक आक्षेपार्ह वर्तनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान आदित्य नारायणनं एका चाहत्याचा फोन हिसकावून पूर्ण ताकदीनं फेकला. यानंतर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड वेगान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये झालेल्या कॉन्सर्टमधील आदित्यचं कृत्य पाहून अनेकजण त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा आदित्य कॉन्सर्टमध्ये अभिनेता शाहरुख खानच्या 'डॉन' चित्रपटातील गाणं गात होता.

आदित्य नारायण केलं गैरवर्तन : आदित्य नारायणचा हा कॉन्सर्ट खूप भव्य होता. या कॉन्सर्टमध्ये स्टेजच्या तिन्ही बाजूंनी वेढलेले चाहते होते. यावेळी अनेक चाहते आदित्यचे व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढत होते. यादरम्यान, आदित्यचं डोके फिरले आणि त्यानं फॅनच्या हातातून फोन जबरदस्तीनं हिसकावून दूरवर फेकला. या प्रकरणाबद्दल फक्त आदित्य नारायण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. या चाहत्यानं काही आक्षेपार्ह कमेंट केली असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. आता कॉन्सर्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक आदित्यला चुकीचं समजत आहेत.

आदित्य नारायण झाला ट्रोल : आदित्यबद्दलचं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. आता या व्हिडिओवर एका यूजरनं लिहिलं आहे की, ''आदित्यचा काय प्रॉब्लेम आहे, त्याला इतका अहंकार का आहे?'' दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, ''हे अपमानास्पद आहे, स्टार असला तर काही पण करणार का ?'' आणखी एका यूजरनं लिहिलं, ''आदित्यच्या कुठुल्याही कॉन्सर्टमध्ये जाणं टाळावं.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.

आदित्यचं इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट : आदित्यच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट लपवण्यात आल्या आहेत. आधी त्याचे चाहते सर्व पोस्ट पाहू शकत होते, मात्र आता त्यानं त्याचं अकाउंट खाजगी केलं आहे. तसेच या अकाउंटमधील काही पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

  1. एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली, पण एल्विश यादवला ना खंत ना खेद!
  2. तुम्ही कोणते चित्रपट पाहणार आहात? या आठवड्यात 'हे' ट्रेलरसह रिलीज झाले टीझर
  3. 'फर्जी' वेब सीरीजला वर्ष पूर्ण झाल्यानं शाहिद कपूरनं शेअर केली पोस्ट, चाहत्यांनी विचारला 'हा' प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.