ETV Bharat / entertainment

विजय वर्माने सुरू केले 'मटका किंग'चे शूटिंग, नागराज मंजुळे करतोय दिग्दर्शन - Matka King - MATKA KING

NAGRAJ MANJULE : बॉलिवूड अभिनेता विजय वर्माच्या आगामी 'मटका किंग' या मालिकेचं शूटिंग सुरू झालं आहे. या मालिकेचं नवीन पोस्टर विजयने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.

Matka King
मटका किंग (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 9:01 PM IST

मुंबई NAGRAJ MANJULE : सध्या बॉलिवूड अभिनेता विजय वर्माची मुख्य भूमिका असलेल्या 'मटका किंग' या क्राईम थ्रिलर मालिकेची बरीच चर्चा आहे. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी यासंबंधी एक मोठे अपडेट जारी केलं आहे. विजय वर्माचं नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी सांगितले की, मालिकेचे शूटिंग सुरू झालं आहे. पोस्टरमध्ये विजय ९० च्या दशकातील अवतारात दिसत आहे. त्याने पांढरा शर्ट घातला आहे आणि तो पत्ते खेळताना दिसत आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "सट्टा लावण्यासाठी तयार रहा! मटका किंग लवकरच, पण शूटिंग आता सुरू झालं."

९० च्या दशकातील कथा

'मटका किंग'ची कथा 1960 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे, ज्यामध्ये एक कापूस व्यापारी 'मटका' नावाचा नवीन जुगार खेळतो. हा खेळ शहरात वादळ निर्माण करतो. पूर्वी हा खेळ फक्त श्रीमंतांसाठी राखीव होता पण आता सर्व वर्गातील लोक यात सहभागी होऊ लागले. या मालिकेत कृतिका कामरा, सई ताम्हणकर, गुलशन ग्रोव्हर आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांचा समावेश आहे. रॉय कपूर फिल्म्सच्या बॅनरखाली गार्गी कुलकर्णी, आशिष आर्यन आणि अश्विनी सिडवानी यांच्यासह सिद्धार्थ रॉय कपूर आणि नागराज मंजुळे यांची निर्मिती असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन नागराज यांनी केलं आहे आणि मंजुळे यांच्यासह अभय कोरान यांनी याची कथा लिहिली आहे.

गर्लफ्रेंड तमन्ना भाटियानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विजय वर्माच्या मटका किंगचं पोस्टर शेअर केलं आणि कॅप्शन लिहिले, 'उफ'. विजय वर्माच्या चाहत्यांनी देखील कमेंट सेक्शनमध्ये या आगामी मालिकेबद्दल उत्सुकता दाखवली. एका चाहत्यानं लिहिले की, 'आता फार काळ याच्या रिलीजची प्रतीक्षा करू शकत नाही'. ही मालिका प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, विजय वर्मा शेवटचा 'मर्डर मुबारक' या स्ट्रीमिंग मिस्ट्री थ्रिलर चित्रपटमध्ये दिसला होता. यामध्ये पंकज त्रिपाठी आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत होते. तो लवकरच 'सूर्या 43' आणि 'उल जलुल इश्क' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. 'बाई गं'मध्ये सहा हिरॉईनचा नायक बनला स्वप्नील जोशी, 'जंतर मंतर' गाणं प्रदर्शित - Swapnil Joshi
  2. गोळीबार प्रकरणी सलमान आणि अरबाज खानचे पोलिसांनी नोंदवले जबाब - Salman Khans statement
  3. 'चंदू चॅम्पियन'च्या स्क्रिनिंगमध्ये रिअल हिरो मुरलीकांत पेटकर आणि कार्तिक आर्यन झाले भावूक - kartik aaryan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.