मुंबई - Vijay Deverakonda: साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर अभिनीत 'देवरा: पार्ट 1' उद्या म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ज्युनियर एनटीआरच्या या चित्रपटाबद्दल फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील खूप उत्सुक आहेत. आता अलीकडेच साऊथ स्टार विजय देवरकोंडानं या चित्रपटाबद्दल आपली उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
विजय देवरकोंडाला पाहायचा आहे 'देवरा: पार्ट 1' : 'देवरा: पार्ट 1'चा ट्रेलर शेअर करताना विजय देवराकोंडानं त्याच्या पोस्टवर लिहिलं, 'तारक अण्णा, शिवा सर, जान्हवी कपूर आणि अनिरुद्ध अधिकृतपणे या वीकेंडला एका मोठ्या ब्लॉकबस्टरची मी वाट पाहत आहे. ऑल द बेस्ट 'देवरा'. कोरटाला शिवा दिग्दर्शित, 'देवरा: पार्ट 1' हा किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित असून लोकांच्या हक्कांसाठी लढत असल्याची कथा यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर देवराची भूमिका साकारत आहे. याशिवाय जान्हवी कपूर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. याशिवाय सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैफचं नाव भैरा असणार आहे.
'देवरा: पार्ट 1'चं आगाऊ बुकिंग जोरदार : 'देवरा: पार्ट 1' चित्रपटात साऊथ स्टार श्रीकांत, शाइन टॉम चाको, नारायण, चैत्रा राय, कलैयारासन आणि अभिमन्यू सिंग हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्युनियर एनटीआरचा ॲक्शन ड्रामा हा दोन दिवसांनी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटानं चित्रपटगृहांच्या तिकिट काउंटरवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाच्या जगभरात 50 कोटी रुपयांच्या तिकिटे प्री-सेल झाल्या आहेत. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगमुळे पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याची आशा आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान विजय देवराकोंडाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अलीकडेच त्याच्या आगामी 'वीडी 12' ( VD 12) या चित्रपटाची घोषणा केली. इंस्टाग्रामवर त्यानं दोन पोस्टर शेअर करताना, या चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर केली. त्याचा हा चित्रपट 28 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटामधील पोस्टर शेअर करताना त्यांनं कॅप्शन लिहिलं की, 'त्यांचे भाग्य त्यांची वाट पाहत आहे.' चुका, रक्तपात, प्रश्न, पुनर्जन्म, 28 मार्च 2025, 'वीडी 12.' आता अनेक चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत.
हेही वाचा :
- विजय देवरकोंडानं शेअर केले 'हॅट फेज' फोटो; चाहत्यानी विचारलं फोटो 'स्वीटहार्ट मंदान्ना'नं काढले का? - VIJAY DEVERAKONDA HAT PHASE 2024
- विजय देवराकोंडाच्या वाढदिवसानिमित्त 'राउडी जनार्दन'ची घोषणा, पोस्टर रिलीज - Vijay Deverakonda Birthday
- विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर स्टारर 'फॅमिली स्टार' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - family star