ETV Bharat / entertainment

विजय देवेरकोंडा प्रेमविवाह करणार, पण...: व्हिडिओ व्हायरल - vijay deverakonda - VIJAY DEVERAKONDA

Vijay Deverakonda : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या चर्चेत आला आहे. 'द फॅमिली स्टार' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यानं लग्नाबद्दलची चर्चा केली आहे.

Vijay Deverakonda
विजय देवेरकोंडा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 4:04 PM IST

मुंबई - Vijay Deverakonda : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या चित्रपटांबरोबर त्याच्या कथित प्रेमसंबंधांमुळेही चर्चेत असतो. विजय सध्या त्याच्या आगामी 'द फॅमिली स्टार्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात सध्या व्यग्र आहे. 'द फॅमिली स्टार' 5 एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'द फॅमिली स्टार'च्या प्रमोशनदरम्यान त्यानं असं काही म्हटलं की, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय देवरकोंडाच्या चाहत्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की तो अभिनेत्री रश्मिका मंदान्ना डेट करत आहे.

विजय देवरकोंडा कधी करणार लग्न : या जोडप्यानं त्यांचं नात आतापर्यत जगासमोर कबूल केलेले नाही. मात्र अनेकदा हे जोडपे एकत्र दिसले आहेत. दरम्यान 'द फॅमिली स्टार' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजयनं त्याच्या लग्नाबद्दल आणि कुटुंब वाढवण्याबाबत विधान केलं आहे. जेव्हा त्याला एका पत्रकारानं विचारले की, तू 2024मध्ये लग्न करण्याचं प्लानिंग करत आहे. यावर त्यानं म्हटलं, "आता 2024मध्ये नाही पण काही दिवसांनी लग्न नक्की करेल. मला पण वाटतं की, माझ लग्न व्हावं आणि मुले व्हावीत. यानंतर तो हसतो आणि पुढं म्हणतो की लव्ह मॅरेज करेल पण माझ्या निवडीला कुटुंबानं सहमती देणे महत्त्वाचे आहे.'' त्याचा लग्नाबाबत बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

विजय वर्कफ्रंट : विजय आणि रश्मिका यांची जोडी ही अनेकांना आवडते. दोघांनी 'गीता गोविंदम' आणि 'कॉमरेड' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या सुंदर जोडप्याचे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तेव्हापासून दोघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दरम्यान विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'जन गण मन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहे. 'जन गण मन' चित्रपटाचे निर्माते चार्मी कौर, वामसी पेडीपल्ली हे आहेत. या चित्रपटाच्या बऱ्याचं दिवासांपासून चर्चा सुरू आहेत. याशिवाय विजय हा 'व्हीडी 12'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक सध्या ठरलेलं नाही.

हेही वाचा :

  1. अंकिता लोखंडे आणि विकी जैन स्टारर म्युझिक अल्बम 'ला पिला दे शराब' फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - ankita lokhande and vicky jain
  2. चमकीला ट्रेलर लाँचमधील परफॉर्मन्स पाहून काही जण परिणीतीला म्हणाले, 'आज गाने की जिद्द ना करो' - Parineeti Chopra Singing
  3. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील खलनायकाचा लूक आला समोर , पाहा पोस्टर - prithviraj sukumaran

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.