ETV Bharat / entertainment

'दो और दो प्यार'च्या स्क्रिनिंगदरम्यान विद्या बालन आणि कार्तिक आर्यननं केली धमाल, व्हिडिओ व्हायरल - vidya balan - VIDYA BALAN

Vidya Balan and Kartik Aaryan: 'दो और दो प्यार'च्या स्क्रिनिंगदरम्यान विद्या बालन आणि कार्तिक आर्यन एकत्र स्पॉट झाले. आता त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Vidya Balan and Kartik Aaryan
विद्या बालन आणि कार्तिक आर्यन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 10:16 AM IST

मुंबई - Vidya Balan and Kartik Aaryan: 'भुल भुलैया 3'मध्ये अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता कार्तिक आर्यनचे चाहते दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दोन्ही स्टार्स बुधवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी रात्री एकत्र दिसले. मुंबईत 'दो और दो प्यार'च्या स्क्रिनिंगदरम्यान दोन्ही कलाकार आपल्या स्टाईलिश अंदाजात दिसले. यादरम्यान दोघेही एकमेकांबरोबर धमाल करताना कॅमेऱ्यात कैद झाले. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्तिक विद्या बालनचे कौतुक करताना दिसत आहे. व्हिडिओत कार्तिक हा विद्याला म्हणतो, 'तू छान दिसत आहेस.' स्तुती केल्यानंतर विद्या प्रेमानं कार्तिकचा गाल ओढते. यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि गमतीशीर संवादही साधला.

विद्याला करायची आहे कॉमेडी : 'भूल भुलैया' फ्रँचायझीमध्ये विद्याच्या पुनरागमनाच्या घोषणेनं चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 'भूल भुलैया 3'मध्ये तृप्ती दिमरीबरोबर कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटामध्ये विद्या असल्यामुळे चाहते 'भूल भुलैया 3'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्यानं 'भूल भुलैया 3' मधील तिच्या सहभागाबद्दल सांगताना म्हटलं की, 'एक अभिनेत्री म्हणून मला असे वाटते की मला कॉमेडी करण्याची संधी मिळाली नाही आणि मला कॉमेडी करण्याची तळमळ आहे. यावर मी आता नेहमीपेक्षा जास्त विचार करते. मी आत्तापर्यंत सगळ्याच चित्रपट एन्जॉय केला आहेत, पण आता मला वाटते की मला हसायचं आहे. काही दिवसांसाठी, थोड्या काळासाठी, काही वर्षांसाठी.'

'भूल भुलैया 3ची शुटिंग : आगामी 'भूल भुलैया 3' च्या सीक्वेलमध्ये कार्तिक आर्यन पुन्हा रूह बाबाची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय 'भूल भुलैया 3' चिपटामध्ये माधुरी दीक्षितचं देखील आगमन झालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी यांनी केलंय. याशिवाय या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह, राजपाल यादव, विनीत,माया अलग, बोमन इराणी आणि एलनाझ नोरोझी यांच्या देखील विशेष भूमिका असणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचं पहिल्या टप्प्यामधील शुटिंग पूर्ण झालं आहे. याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील सध्या शुटिंग सुरू आहे.

हेही वाचा :

  1. दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घरावर गोळीबार, बिहारमध्येच रचला होता गोळीबाराचा कट; चौकशीत धक्कादायक खुलासे - Salman Khan House Firing
  2. आराध्या बच्चनबद्दल आत्येबहीण नव्या नवेलीची भन्नाट प्रतिक्रिया, पॉडकास्टमध्ये केलं नव्या पिढीचं गुपित उघड... - Navya Nanda talk about Aaradhya
  3. वरुण धवनसह सामंथानं दिले 'सिटाडेल: हनी बनी' रिलीजचे संकेत - Varun Dhawan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.