ETV Bharat / entertainment

बाबाजींच्या गुहेत रजनीकांत, पर्वतारोहणाचा व्हिडिओ व्हायरल - Rajinikanth - RAJINIKANTH

Video of Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या मित्रांसह उत्तराखंडमधील महावतार बाबाजी गुहांना भेट दिली. इथले त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rajinikanth
रजनीकांत ((ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 7:12 PM IST

मुंबई - Video of Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत सध्या हिमालयाच्या आध्यात्मिक यात्रेसाठी भ्रमंती करत आहे. अलीकडेच त्यानं उत्तराखंडमधील महावतार बाबाजी गुहांना भेट दिली. पोलीस अधिका-यांनी वेढलेल्या एका उंच टेकडीवरून उतरतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबाजी गुंफांव्यतिरिक्त रजनीकांतनं उत्तराखंड आणि आसपासच्या अनेक तीर्थक्षेत्रांनाही भेट दिली. तो अजून काही दिवस तिर्थ यात्रा करणार असून त्यानंतर तो चेन्नईला परतणार आहे.

रजनीकांतचा पर्वतारोहणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

३ जून रोजी सोशल मीडियावर रजनीकांतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्याचे मित्रही 'जेलर' अभिनेत्याबरोबर स्पॉट झाले होते. हातात काठ्या घेऊन काही पोलीस अधिकारी रजनीकांतला डोंगर चढण्यास मदत करताना दिसत आहेत. दरवर्षी रजनीकांत अध्यात्मिक प्रवासासाठी जातो. त्यामुळेच यावेळी तो उत्तराखंडमधील बाबाजी गुहेला भेट देण्यासाठी गेला आहे.

या दिवशी रजनीकांतचा वेट्टय्यान प्रदर्शित

अलीकडेच रजनीकांतच्या एका प्रवासादरम्यान एका साधूशी भेट झाली. त्याच्याबरोबर संभाषणात त्यानं त्याच्या आगामी 'वेट्टियान' आणि 'कुली' या चित्रपटांबद्दल काही अपडेट्स शेअर केले. त्यानं खुलासा केला की, दिग्दर्शक टी जे ज्ञानवेलचा 'वेट्टैयान' दसऱ्याच्या वेळी १० ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तो पुढे म्हणाला की, तो 10 जूनपासून दिग्दर्शक लोकेश कनगराजच्या 'कुली' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रजनीकांत अखेरचा ऐश्वर्या-रजनीकांतच्या 'लाल सलाम'मध्ये दिसला होता. या चित्रपटाला लोकांनी तसंच त्याच्या खास प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला होता. आता नवीन येणाऱ्या चित्रपटाकडून लोकांच्या तसंच त्याच्या खास चाहत्यांच्या नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत.

हेही वाचा -

किशोरवयीन मुलांच्या संवेदनशील कथेवरील 'अनन्या व्हॉट इफ' चित्रपट थेट यूट्यूबवर प्रदर्शित - Ananya What If

लवकरच वडील होणार वरुण धवन, वांद्रा येथील हिंदुजा हॉस्पिटलच्या बाहेर झाला स्पॉट - Varun Dhawan

नताशा-हार्दिकचा घटस्फोट झाला नाही, हार्दिक पांड्याच्या पत्नीनं विभक्त होण्याच्या अफवांवर ट्रोल्सला दिलं उत्तर - Natasha Hardik Not Divorced

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.