ETV Bharat / entertainment

विकी कौशलनं जुन्या आठवणींना उजाळा देत पत्नी कतरिना कैफला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - KATRINA KAIF - KATRINA KAIF

Katrina Kaif Birthday: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आज 16 जुलैला तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी विकी कौशलनं आपल्या लेडी लव्हला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Kaif Birthday
कतरिना कैफचा वाढदिवस ((फाईल फोटो) (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 2:08 PM IST

मुंबई - Katrina Kaif Birthday : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आज 16 जुलै रोजी 41 वर्षांची झाली आहे. या खास दिवशी तिला अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. अलीकडेच तिचा पती अभिनेता विकी कौशलनं तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. विकीनं या खास प्रसंगी थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. 16 जुलै रोजी विकी कौशलनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपल्या सुंदर पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला. या फोटोंमध्ये दोघांमध्ये खास बॉन्ड असल्याचं दिसत आहे. या पोस्टवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "तुझ्याबरोबर चांगल्या आठवणी बनवणे हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव."

विकी कौशलनं शेअर केले फोटो : कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त विकी कौशलनं सुंदर फोटो शेअर केल्यानंतर, आता अनेक चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. याशिवाय विकीनं लग्नामधील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये विकी हा आपल्या पत्नीची काळजी घेताना दिसत आहे. एका फोटोमध्ये विकी आणि कतरिना हे दोघेही देवाजवळ प्रार्थना करताना दिसत आहेत. याशिवाय आणखी एका फोटोमध्ये दोघेही बिचवर एंजॉय करताना करत आहेत. विकीनं शेअर केले फोटो अनेकांना पसंतीस उतरत आहेत. या जोडप्याच्या फोटोला अनेकजण 'लाईक'चा देत आहेत.

विकी कौशलचं वर्कफ्रंट : विकी कौशलनं फोटो पोस्ट करताच सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. पोस्टवर कमेंट करताना अनन्या पांडेनं लाल हार्टच्या इमोजीसह कॅप्शनमध्ये 'बेस्ट' लिहिलं आहे. आयुष्मान खुरानानं कतरिनाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर साऊथची ब्युटी राशी खन्नानं पोस्टवर कौतुकचा वर्षाव केला आहे. दुसरीकडे, चाहत्यांनीही कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जोडी सुंदर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'बॅड न्यूज', 'तख्त', 'लुका चुप्पी 2', आणि 'छावा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याचा 'लव्ह ॲन्ड वॉर' हा चित्रपट आलिया भट्ट आणि रणबीर कपूरबरोबर येणार आहे.

हेही वाचा :

  1. 'शीला की जवानी' ते 'काला चष्मा'पर्यंत प्रत्येक गाण्यावर बेभान नृत्य करणाऱ्या कतरिना कैफचा वाढदिवस - Katrina Kaif Birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.