ETV Bharat / entertainment

चांगली बातमी 'बॅड न्यूज' ओटीटीवर रिलीज - Vicky Kaushal and Tripti Dimri - VICKY KAUSHAL AND TRIPTI DIMRI

Bad Newz OTT Release: विकी कौशल आणि तृप्ती डिमरी अभिनीत 'बॅड न्यूज' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे खर्च करावे लागणार आहे.

Bad Newz OTT Release
बॅड न्यूज ओटीटी रिलीज (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 12:26 PM IST

मुंबई - Bad Newz OTT Release: अभिनेता विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांचा कॉमेडी चित्रपट 'बॅड न्यूज'नं चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मोठ्या पडद्यावर आल्यापासून, चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहात होते. दरम्यान हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक आनंद तिवारी यांचा 'बॅड न्यूज' एक दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवार 31 ऑगस्टपासून, ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आता प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. सध्या निर्मात्यांनी हा कॉमेडी चित्रपट ओटीटीवर भाडेतत्त्वावर लॉन्च केला आहे. यासाठी आता प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहे.

'बॅड न्यूज' ओटीटी रिलीज : 'बॅड न्यूज'चं बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली होती. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटामधील गाणीदेखील खूप हिट झाली आहेत. 'बॅड न्यूज' हा खूप कमी बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 64.51 कोटीची कमाई केली. या चित्रपटाचं जगभरातील एकूण कलेक्शन 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांनी धमाकेदार अभिनय केला आहे. 'बॅड न्यूज' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि अमृतपाल सिंह बिंद्रा यांनी केली आहे.

वर्कफ्रंट : 'बॅड न्यूज' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 19 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली होती. यानंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर झपाट्यानं कमाई केली. हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानं प्रेक्षकांना खूप खुश आहेत. दरम्यान विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आता पुढं तो 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर' , 'लुका छुपी 2' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'छावा' चित्रपट देखील आहे. यामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. विकी कौशल स्टारर 'बॅड न्यूज'नं केली रिलीजच्या पहिल्या दिवशी छप्परफाड कमाई - Bad Newz Box Office
  2. 'बॅड न्यूज' ठरतोय नॉन-स्टॉप एंटरटेनमेंट, विकी कौशलच्या परफॉर्मन्सवर नेटिझन्स फिदा - Bad Newz X Review
  3. 'बॅड न्यूज'ची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाकेदार कमाई, सेन्सॉर बोर्डानं चालवली तीन चुंबन दृष्यांवर कात्री - Bad Newz

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.