ETV Bharat / entertainment

रजनीकांत स्टारर 'वेट्टयान'च्या ओपनिंग सॉन्गमध्ये अनिरुद्ध रविचंदरची डान्स क्लिप लीक - vettaiyan Movie - VETTAIYAN MOVIE

Vettaiyan Opening Song : 'वेट्टयान'च्या ओपनिंग सॉन्गमध्ये संगीतकार अनिरुद्ध रविचंदर कॅमिओमध्ये दिसणार आहे. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रजनीकांतबरोबर तो डान्स करताना दिसत आहे.

Vettaiyan Opening Song
वेट्टयान ओपनिंग सॉन्ग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 4:57 PM IST

मुंबई- Vettaiyan Opening Song : रजनीकांत सध्या त्याच्या 'कुली' आणि 'वेट्टयान' या दोन ॲक्शन चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. आता त्याचे चाहते त्याच्या या दोन्ही चित्रपटांची खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रजनीकांत सध्या 'वेट्टयान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आता शूटिंगमधील 'वेट्टयान'च्या ओपनिंग सॉन्गची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रंजनीकांत सूट-बूट घालून डान्स करताना दिसत आहे. याशिवाय या क्लिपमध्ये चित्रपट संगीतकार अनिरुद्ध रविचंदर कॅमिओ करताना दिसत आहेत. तसंच क्लिपमध्ये बाकी कलाकार देखील दिसत आहेत.

'वेट्टयान'मध्ये रजनीकांत साकारणार पोलिसाची भूमिका : व्हिडिओत अनिरुद्ध हा रजनीकांतसमोर वाकून नमस्कार आणि हाय-फाय करताना दिसत आहे. याआधी 27 फेब्रुवारी रोजी रजनीकांत हा हैदराबादमध्ये शूटिंग करताना दिसला होता. यावेळी तो पोलिसाच्या गणवेशात होता. दरम्यान रजनीकांत हा कारमधून बाहेर आल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला घेरलं होतं. यानंतर रजनीकांतनं चाहत्यांना अभिवादन केलं. रजनीकांत आपल्या ड्रायव्हरबरोबर शूटिंग सेटवर पोहोचला होता. 'वेट्टयान' चित्रपटात रजनीकांत एका मुस्लिम पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याची जबरदस्त अ‍ॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

वर्कफ्रंट : 'वेट्टयान' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. टीजे ज्ञानेवाल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, राणा दग्गुबत्ती, फहाद फासिल, मंजू वॉरियर, रितिका सिंग, दुशारा विजयन हे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती लायका प्रॉडक्शन करत आहे. दरम्यान रजनीकांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी तो 'लाल सलाम' या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केली नाही. आता पुढं तो 'जेलर 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 'जेलर'चा दुसरा भाग आहे. या चित्रपटामध्ये देखील रजनीकांतचा हटके अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मधील कैकेयीच्या भूमिकेबद्दल केला लारा दत्तानं खुलासा, वाचा सविस्तर - lara breaks silence on kaikeyi role
  2. 'पुष्पा 2'च्या निर्मात्यानं शेअर केलं नवीन पोस्टर, पाहा अल्लू अर्जुनचा दमदार लूक - pushpa 2
  3. अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5'चं शूटिंग ऑगस्टपासून यूकेमध्ये होणार सुरू - housefull 5

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.