ETV Bharat / entertainment

सोलो रिलीज 'देवरा'बद्दल 'चिंताग्रस्त' ज्युनियर एनटीआर, ट्रेलर लॉन्चच्या वेळी केलं भाष्य - Devara Trailer

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 5:31 PM IST

Devara Trailer : ज्युनियर एनटीआरनं आगामी 'देवरा' चित्रपटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 'आरआरआर'नंतर त्याचा पहिला एकल चित्रपट रिलीज होणार आहे. मुंबईत 'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम झाला आहे.

Devara Trailer
देवरा ट्रेलर (Reporter)

मुंबई - Devara Trailer : ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान 'देवरा : पार्ट 1'चा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम 10 सप्टेंबर रोजी मुंबईत झाला. इव्हेंटमध्ये, ज्युनियर एनटीआरनं चित्रपटाच्या रिलीजबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सहा वर्षांनंतर एकल नायक म्हणून त्याचं पुनरागमन रुपेरी पडद्यावर होत आहे. भारताच्या कमी-प्रसिद्ध किनारपट्टीच्या प्रदेशांच्या पार्श्वभूमीवर सेट केलेला, 'देवरा: पार्ट 1' चित्रपट खूप दमदार असणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. ज्युनियर एनटीआरचा शेवटचा एकल चित्रपट 'अरविंदा समेथा वीरा राघव' 2018 मध्ये आला होता.

ज्युनियर एनटीआरनं सांगितलं 'देवरा' चित्रपटाबद्दल : 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा सध्या केली जात आहे. या कार्यक्रमात दिग्दर्शक कोराटला शिवाबरोबरच्या सहकार्याबद्दल बोलताना, ज्युनियर एनटीआरनं सांगितलं, "मी खूप घाबरलो आहे कारण 'आरआरआर'नंतर हा माझा पुढचा चित्रपट आहे. 'आरआरआर' हा माझा सह-अभिनेता राम चरण याच्याबरोबरचा होता, सहा वर्षांनंतर ही माझी एकल रिलीज आहे, त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे."

ज्युनियर एनटीआरनं 38 दिवस केलं पाण्याखाली शूट : मुंबईत ट्रेलर लॉन्च करताना ज्युनियर एनटीआरनं पुढं सांगितलं, "मुंबई शहरात 'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करताना मला खूप आनंद होत आहे, कारण आम्हाला आलेला अनुभव खूपच चांगला होता." दरम्यान 'देवरा'मध्ये जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा ॲक्शन सिक्वेन्स अत्यंत आव्हानात्मक आहे. या कार्यक्रमादरम्यान ज्युनियर एनटीआरनं उघड केलं की, तो सुमारे 38 दिवस पाण्याखाली चित्रपटाचं शूटिंग करत होता. याबद्दल बोलताना त्यानं पुढं सांगितलं, "मी एक विशिष्ट स्टंट दाखवू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की 'देवरा' हा सर्वांच्या मनाला भुरळ घालणार आहे." आता अनेक चाहते ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाच्या रिलीजसाठी वाट पाहात आहेत. या चित्रपटाद्वारे जान्हवी ही साऊथ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. 'देवरा' चित्रपटासाठी ती खूप उत्सुक असल्याचं तिनं या कार्यक्रमात सांगितलं होतं. आता सोशल मीडियावर या कार्यक्रमामधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

हेही वाचा:

'देवरा पार्ट 1'मध्ये जूनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत झळकणार, नवीन पोस्टर व्हायरल - jr ntr

'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं पाहिल्यानंतर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडनं दिली 'ही' प्रतिक्रिया - devara part 1

ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं रिलीजसाठी सज्ज - devera part 1

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.