ETV Bharat / entertainment

करण जोहर निर्मित, वरुण धवन स्टारर चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'चं शूटिंग सुरू - sanskari ki tulsi kumari Movie - SANSKARI KI TULSI KUMARI MOVIE

Varun Dhawan and Janhvi Kapoor : वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'चं शूटिंग सुरू झालं आहे. सोशल मीडियावर करण जोहरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Varun Dhawan and  Janhvi Kapoor
वरुण धवन आणि जान्हवी कपूर (Varun Dhawan (Instagram image))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 11:09 AM IST

Updated : May 5, 2024, 1:18 PM IST

मुंबई - Varun Dhawan and Janhvi Kapoor : अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर दुसऱ्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघेही 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. जेव्हापासून करण जोहरनं त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे, तेव्हापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ आहे. 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या रोमँटिक ड्रामाचं शूटिंग सुरू झालं आहे. करण सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.

करण जोहरनं शेअर केला व्हिडिओ : शेअर केलेल्या व्हिडिओत वरुण धवन, जान्हवी कपूर, रोहित सराफ, सान्या मल्होत्रा आणि चित्रपटामधील संपूर्ण कास्ट दिसत आहे. या चित्रपटाची कास्ट शूटिंग सुरू करण्यापूर्वी पुजा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ग्रुप पिक्चर्सही आहेत. करण जोहरनं या व्हिडिओच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "फक्त शुद्ध प्रेम!. 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' त्यांच्या कुटुंबियांबरोबर शूटिंग करत आहे. यांना प्रेम आणि आशीर्वाद द्या!, 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपट थिएटरमध्ये, 18 एप्रिल 2025!" रिलीज होईल" या रोमँटिक चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन करत आहे. याशिवाय वरुणनं देखील त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूर-वरूण धवनचं वर्क फ्रंट : याशिवाय वरुणनं शेअर केलेल्या पोस्टवर या चित्रपटाबद्दलच्या शुटिंगची माहिती दिली आहे. या चित्रपटाचे शूटिंग वर्षाच्या अखेरीस संपणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. करण जोहरनं शेअर केलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जान्हवी आणि वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचं झालं तर, ती राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे. तसेच ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान अभिनीत 'देवरा' मधून ती तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. वरुण धवनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'बेबी जॉन' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय पुढं तो 'सिटाडेल' या वेब सीरीजमध्ये पहिल्यांदाच सामंथा रुथ प्रभुबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच तो पुढं 'स्त्री 2'मध्ये श्रद्धा कपूरबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटाचं शूटिंग सुरू - Sunny Sanskari Ki Tulsi Kumari
  2. रणबीर-आलिया प्रिय मुलगी राहाबरोबर झाले स्पॉट, राहाच्या हसण्याची चाहत्यांना भुरळ - Ranbir Alia spotted with Raha
  3. आलिया भट्टचा शॉर्ट्समधील व्हिडिओ झाला व्हायरल, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया - Alia Bhatt Summer Outfit

Last Updated : May 5, 2024, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.