ETV Bharat / entertainment

हनु-मॅन फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नासाठी केलं आमंत्रित, फोटो व्हायरल - Varalaxmi Sarathkumar - VARALAXMI SARATHKUMAR

Varalaxmi Sarathkumar : साऊथ अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारननं लग्नासाठी अनेक सुपरस्टार्सना आमंत्रित केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिच्या लग्नाची पत्रिका दिली आहे.

Varalaxmi Sarathkumar
वरलक्ष्मी सरथकुमारन ((IMAGE- Varalaxmi Sarathkumar))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 5:41 PM IST

मुंबई- Varalaxmi Sarathkumar : साऊथचा सुपरहिरो चित्रपट 'हनु-मॅन'मध्ये तेजा सज्जाच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारन विवाहबंधनात अडकणार आहे. आता ती स्वतः तिच्या लग्नाच्या पत्रिका वितरित करत आहे. लग्नासाठी अनेक सुपरस्टार्सना आमंत्रित केल्यानंतर वरलक्ष्मीनं आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिच्या लग्नाची पत्रिका दिली आहे. मोदींना तिच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी ती आपल्या कुटुंबासह आणि होणाऱ्या पती निकोलस सचदेवबरोबर गेली होती. वरलक्ष्मी सरथकुमारनं पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर आता काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

वरलक्ष्मी सरथकुमारनं दिलं पीएम मोदींना लग्नाचं आमंत्रण : वरलक्ष्मीचे वडील आणि राजकारणी आर. सरथकुमार आणि आई राधिका सरथकुमारही यावेळी उपस्थित असल्याचं दिसले. वरलक्ष्मी सरथकुमारनं, पंतप्रधान मोदींबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, "पंतप्रधानांना भेटणं हे आमचं भाग्य आहे, आम्ही त्यांना आमच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आमंत्रित केलं आहे, तुमच्या विनम्रतेबद्दल आणि स्वागतासाठी धन्यवाद, तुमच्या व्यग्र वेळापत्रक असल्यानंतर देखील, तुम्ही आम्हाला वेळ दिला यासाठी धन्यवाद. ही भेट घडवून आणल्याबद्दल आई आणि बाबा तुमचा देखील धन्यवाद." वरलक्ष्मी सरथकुमार आणि निकोलस सचदेव यांच्या लग्नात अनेक व्हीआयपी सेलिब्रिटी पाहुणे हजर असणार असल्याचं समजत आहे.

वरलक्ष्मी सरथकुमारचं होईल 'या' दिवशी लग्न : याआधी वरलक्ष्मीनं सुपरस्टार रजनीकांत आणि अल्लू अर्जुन यांना लग्नपत्रिका दिली होती. वरलक्ष्मीनं 1 मार्च 2024 रोजी निकोलस सचदेवबरोबर एंगेजमेंट केली होती. यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास नातेवाईक उपस्थित होते. आता तिचं लग्न 2 जुलै रोजी थायलंडमध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे. वरलक्ष्मीचं लग्न खूप भव्य पद्धतीनं होणार आहे. तिचे अनेक चाहते तिच्या लग्न होत असल्यामुळे खूप खुश आहेत. तिच्यावर अनेकजण सोशल मीडियावर अभिनंदाचा वर्षाव करताना दिसत आहे. दरम्यान तेजा सज्जा स्टारर 'हनु-मॅन' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता पुढं ती 'रायन', 'मॅक्स', 'तत्वमसी' आणि 'पगाइये कथिरू' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. रजनीकांतनं पोस्ट शेअर करून प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचं केलं कौतुक - KALKI 2898 AD
  2. कृतिका मलिकनं धक्कादायक विधान; बिग बॉसमध्ये खळबळ, पती अरमान मलिकलाही धक्का - bigg boss ott 3
  3. कतरिना कैफनं पती विकी कौशल स्टारर 'बॅड न्यूज'च्या ट्रेलरवर दिली प्रतिक्रिया, झाली पोस्ट व्हायरल - KATRINA KAIF

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.