मुंबई - Valentines Day 2024: 'व्हॅलेंटाईन्स डे'चा हा आठवडा प्रेमाचा, आपुलकीचा आणि रोमान्सचा आहे. 14 फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन्स डे' तुमच्या जोडीदाराबरोबर खास बनवायचा असेल, तर काही रोमँटिक बॉलिवूड चित्रपट तुम्ही पाहू शकता. अशा टॉप पाच हिंदी चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'दिल तो पागल है' : शाहरुख खान , माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर स्टारर 'दिल तो पागल है' चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील गाणी खूप गाजली होती. 'दिल तो पागल है' चित्रपटामध्ये लव्ह ट्रँगल दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट 1997मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं होत.

2. जब वी मेट : इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'जब वी मेट' एक मनोरंजक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, जो एकतर्फी प्रेमावर आधारित आहे. या चित्रपटामधील आदित्य (शाहिद कपूर) आणि गीत (करीना कपूर) यांची जोडी तुम्हाला खळखळून हसवणार आणि भावूक देखील करेल. शाहिद कपूर आणि करीना कपूर यांनी या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

3. बर्फी : अनुराग बसुचा 'बर्फी!' हा एक अनोखा आणि मनोरंजक चित्रपट आहे. या चित्रपटात 'बर्फी' नावाच्या मूकबधिर मुलाची कहाणी दाखवली गेली आहे. बर्फीमध्ये रणबीर, प्रियांका चोप्रा आणि इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत आहेत. दार्जिलिंगच्या सुंदर लोकेशनवर चित्रित झालेला हा चित्रपट प्रेम, मैत्री आणि त्यागाची अप्रतिम कहाणी आहे. प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगण्याबरोबरच हा चित्रपट तुम्हाला हसवू आणि रडवू शकतो.

4. 2 स्टेट्स : आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर स्टारर '2 स्टेट्स' हा महाविद्यालयीन रोमान्सवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अर्जुन (क्रिश मल्होत्रा) आणि आलिया (अन्यना स्वामीनाथन) वेगवेगळ्या राज्यांचे असतात. '2 स्टेट्स' चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की, हे जोडपे त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या लग्नासाठी पटवतात. भिन्न संस्कृतीचे असूनही हे जोडपे आपले प्रेम यशस्वी बनवतात. हा चित्रपट खूप मनोरंजक आहे.

5. 'लव्ह आज कल' : इम्तियाज अलीचा आणखी एक सुंदर रोमँटिक चित्रपट 'लव्ह आज कल' वेगवेगळ्या काळातील प्रेम आणि त्यात झालेल्या बदलांवर आधारित आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत ऋषी कपूर आणि नीतू सिंग देखील दिसणार आहेत. 'व्हॅलेंटाईन्स डे'ला म्हणजे आज या चित्रपटाचा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आनंद घेऊ शकता.

हेही वाचा :