मुंबई - Valentine day special movies : हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच रोमँटिक चित्रपटांचा बोलबाला राहिला आहे. रोमँटिक चित्रपटांनी आजपर्यत प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. आता व्हॅलेंटाईन वीक आला आहे. हा 8 दिवसांचा रोमँटिक आठवडा प्रेमी युगुलांचे नाते अधिक जवळ आणतो आणि ते अधिक घट्ट बनवतो. प्रेमाचा हा दिवस फक्त अविवाहित जोडप्यांसाठीच नाही तर विवाहित लोकांसाठीही खूप विशेष आहे. आता आम्ही 'किंग ऑफ रोमान्स' शाहरुख खानच्या 5 क्लासिक चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत, जे तुम्ही या आठवड्यात पाहून पाहू शकता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : रोमँटिक चित्रपटांच्या यादीत 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' पहिल्या क्रमांकावर आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील हा क्लासिक चित्रपट आहे. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोलची जोडी ही अनेकांना या चित्रपटात आवडली होती. या चित्रपटामध्ये राज-सिमरनचा रोमान्स उत्तम प्रकारे सादर करण्यात आला होता. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटामध्ये अमरीश पुरीनं देखील काम केलं होतं. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कुछ-कुछ होता है : शाहरुख खान आणि काजोलची हिट जोडी 'कुछ कुछ होता है' या चित्रपटामध्ये रुपेरी पडद्यावर अनेकांना खूप आवडली होती. या चित्रपटामध्ये या जोडीबरोबर राणी मुखर्जी देखील होती. 'कुछ कुछ होता है'मध्ये काजोल 'अंजली'च्या भूमिकेत आणि शाहरुख 'राहुल'ची भूमिकेत होता. राणी मुखर्जी या चित्रपटामध्ये टीनाच्या भूमिकेत दिसली होती, जी लग्नानंतर लगेचच मरते. यानंतर राहुल आणि अंजली हे कॉलेजचे मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा भेटतात आणि त्यांच्यामध्ये प्रेम फुलतं. करण जोहर आणि शाहरुखनं एकत्र या चित्रपटातून पहिल्यांदाच काम केलं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मोहब्बतें : 'कुछ कुछ होता है'नंतर, शाहरुख खाननं 'मोहब्बतें' या रोमँटिक चित्रपटाद्वारे सिद्ध केलं की, बॉलीवूडच्या बादशाह हा 'रोमान्सचा राजा' देखील आहे. 'मोहब्बतें' या चित्रपटात अभ्यासाबरोबर प्रेम किती महत्त्वाचं आहे, हे दाखवण्यात आलं होतं. आदित्य चोप्रा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि 'मोहब्बतें' या दोन्ही चित्रपटांचा निर्माता आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कल हो ना हो : करण जोहर लिखित 'कल हो ना हो' हा रोमँटिक ड्रामा चित्रपट निखिल अडवाणीनं दिग्दर्शित केला आहे. एक प्रियकर आपल्या प्रेमपात्राच्या आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या इच्छांचा त्याग करताना या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
वीर-जारा : 'वीर जारा' हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील एक कल्ट क्लासिक प्रेम-कहाणी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांनी केलंय. 'वीर-जारा' या चित्रपटात प्रेम आणि त्याग पाहायला मिळतं. 'वीर जारा' चित्रपटात शाहरुख खानला त्याचे खरं प्रेम शोधण्यासाठी 22 वर्ष लागतात.
प्रेमाचा आठवडा
7 फेब्रुवारी - रोज डे दिवस
8 फेब्रुवारी- प्रपोज डे
9 फेब्रुवारी - चॉकलेट डे
10 फेब्रुवारी - टेडी डे
11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे
12 फेब्रुवारी - हग दिवस
13 फेब्रुवारी - किस डे
14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे
तुम्हा सर्वांना 'व्हॅलेंटाईन डे'च्या हार्दिक शुभेच्छा...
हेही वाचा :