मुंबई : अभिनेता वरुण धवन स्टारर 'बेबी जॉन' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. हा टीझर प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि तेव्हापासून प्रत्येकजण ट्रेलर रिलीजची वाट पाहत होते. 9 डिसेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता हा ट्रेलर प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे. 'बेबी जॉन'चा ट्रेलर ॲक्शननं भरलेला असून यात जॅकी श्रॉफनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वरुण धवन एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे, जो बलात्कार पीडितांसाठी लढतो. याशिवाय ट्रेलरमध्ये 'भाईजान'ची दमदार एन्ट्री शेवटी दाखवण्यात आली आहे.
'बेबी जॉन'चा ट्रेलर जोरदार : ट्रेलरमध्ये वरुण धवननं दमदार परफॉर्मन्स दिला आहे. याशिवाय जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत थरारक दिसत आहे. तसेच ट्रेलरमध्ये वरुणला एक छोटी मुलगी दाखवली आहे. जिच्यावर संकट आल्यावर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. 'बेबी जॉन'मध्ये सलमान खानचा कॅमिओ आहे. दरम्यान ट्रेलरच्या शेवटी, सलमान खानचे फक्त डोळे दिसत असून त्यानं मास्क घालेला आहे. ' बेबी जॉन'मध्ये कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कीर्ती 'बेबी जॉन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.
'बेबी जॉन' ट्रेलर चाहत्यांना आला पसंत : या चित्रपटाचा ट्रेलर पाहून आता अनेकजण वरुण धवनचे कौतुक करत आहेत. हा ट्रेलर वरुणनं आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. आता त्याचे चाहते त्याच्या पोस्टच्या कमेंट्स विभागामध्ये आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, 'पापा ऑन फायर.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'सलमान खानचा जबरदस्त कॅमिओ आहे.' आणखी एकानं लिहिलं , 'हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये आग लावून टाकेल.' 'बेबी जॉन' हा एटलीच्या 'थेरी' चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत थलपथी विजय आणि सामंथा रुथ प्रभु दिसले होते. 'बेबी जॉन'चं लेखन आणि दिग्दर्शन कलिश यांनी केलं आहे.
हेही वाचा :