ETV Bharat / entertainment

उर्वशी रौतेला 'एनबीके 109'च्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल - URVASHI RAUTELA INJURED - URVASHI RAUTELA INJURED

Urvashi Rautela : उर्वशी रौतेला ॲक्शन सीन शूट करताना जखमी झाली. तिचा हात फ्रॅक्चर झाला असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची इन्स्टाग्राम पोस्ट मात्र वेगळीच कहाणी सांगतेय.

Urvashi Rautela
उर्वशी रौतेला (Urvashi Rautela - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 11:32 AM IST

मुंबई - Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेला एका चित्रपटामधील ॲक्शन सीन शूट करताना जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून तिला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता तिच्या उपचार सुरू आहेत. रिपोर्टनुसार, उर्वशी हैदराबादमध्ये अभिनेता नंदामुरी बालकृष्णा स्टारर तेलुगू चित्रपट 'एनबीके 109' वर काम करत आहे. सध्या उर्वशीची प्रकृती ही चांगली असल्याचं सांगण्यात येत आहे. उर्वशीच्या हाताचा फ्रॅक्चर हा मोठा असल्याचं सांगण्यात आलंय. उर्वशी टीम सध्या तिची पूर्ण काळजी घेत आहे. 'एनबीके 109' शूटिंग गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र काही तासांपूर्वी उर्वशीच्या अधिकृत 'इन्स्टाग्राम' अकाउंटवरुन पोस्ट झालेल्या स्टोरीवरुन मात्र ती 'नॉर्मल' आयुष्य जगत असल्याचे संकेत मिळत आहेत.

'एनबीके 109' शूटिंग : अर्थात तिने आता पोस्ट केलेले हे व्हिडिओज जुने असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान तिची भूमिका असलेला 'एनबीके 109' हा चित्रपट 2023 मध्ये फ्लोअरवर गेला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन के.एस. रवींद्र, हे करत आहेत. या चित्रपटात नंदामुरी बालकृष्ण व्यतिरिक्त बॉबी देओल, प्रकाश राज, सलमान दुल्कर, पायल राजपूत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती नागा वामसी, साई सौजन्या, सितारा एंटरटेनमेंट्स, फॉर्च्युन फोर सिनेमा आणि श्रीकारा स्टुडिओ बॅनर अंतर्गत केली जात आहे. 'एनबीके 109' चित्रपट 2024 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म 'नेटफ्लिक्स'वर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

उर्वशी रौतेलाचं वर्कफ्रंट : उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची 'जहांगीर नेशनल यूनिवर्सिटी' या चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांवर पाहिजे तशी जादू करू शकला नाही. उलट अनेकांनी या चित्रपटाच्या स्टार कास्ट आणि दिग्दर्शक विनय शर्मावर जोरदार टीका केली होती. या चित्रपटामध्ये उर्वशी रौतेलाव्यतिरिक्त शिवज्योती राजपुत, सिद्धार्थ बोडके, सोनाली सहगल, सोनाली सहगल, रवि किशन, विजय राज, रश्मि देसाई हे कलाकर दिसले होते. हा चित्रपट 'महाकाल मूव्हीज'च्या बॅनरखाली निर्मित केला गेला होता. आता पुढं ती तेलुगू चित्रपट 'ब्लॅक रोज'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहन भारद्वाज करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.