ETV Bharat / entertainment

'तुझे मेरी कसम' होणार 'या' दिवशी रुपेरी पडद्यावर पुन्हा प्रदर्शित, जाणून घ्या तारीख - Riteish Deshmukh - RITEISH DESHMUKH

Tujhe meri kasam : रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा अभिनीत 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. त्याबाबत सविस्तर बातमी वाचा.

Tujhe meri kasam
तुझे मेरी कसम (RITEISH DESHMUKH AND GENELIA DSOUZA - Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 11:20 AM IST

मुंबई : Tujhe meri kasam : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा स्टारर 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या जुने हिट चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. अनेक कल्ट क्लासिक चित्रपट थिएटरमध्ये परतले आहेत. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळालं आहे.

'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या सेटवरच पहिल्यांदा रितेश आणि जेनेलियाची ओळख झाली होती. हा चित्रपट रितेश देशमुखचा पहिला डेब्यू चित्रपट होता. या बॉलिवूडमधील हिट जोडीनं 'तुझे मेरी कसम' नावचा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. या चित्रपटातून जेनेलियानं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

'तुझे मेरी कसम' पुन्हा येईल प्रेक्षकांच्या भेटीला: रितेश आणि जेनेलियाचा हा रोमँटिक ड्रामा पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होत असल्यानं दोघांचे चाहते खूप खुश आहेत. या चित्रपटाच्या रिलीजबाबत रितेशनं म्हटलं, "माझा 'तुझे मेरी कसम' चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये येत आहे. याचा मला खूप आनंद आहे. हा चित्रपट केवळ माझा पहिलाच चित्रपट नव्हता, तर माझ्या आयुष्यातील एका सुंदर गोष्टीची सुरुवातही होती. त्या सुरुवातीच्या दिवसांना पुन्हा भेट देणे आणि तो खास क्षण आमच्या चाहत्यांसह पुन्हा शेअर करणं आश्चर्यकारक असणार आहे. 13 सप्टेंबरला भेटू."'तुझे मेरी कसम' हा चित्रपट 2003 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. 'तुझे मेरी कसम' हा मल्याळम चित्रपट 'निराम'चा रिमेक आहे. ट्रू एंटरटेनमेंटद्वारे वितरीत केलेला 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट संपूर्ण देशात पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.

जेनेलिया डिसूजसाठी चित्रपट आहे विशेष : या चित्रपटादरम्यान रितेश आणि जेनेलिया एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जेनेलियानं या चित्रपटाबद्दल सांगितलं की, "या चित्रपटाचे माझ्या मनात खूप खास स्थान आहे. 'तुझे मेरी कसम' चित्रपटाद्वारे, माझा चित्रपटसृष्टीमधील प्रवास हा रितेशबरोबर सुरू झाला. या प्रेमकहाणीची जादू चाहत्यांबरोबर पुन्हा अनुभवायला मी खूप उत्सुक आहे." दरम्यान रितेश आणि जेनेलियानं अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर 2012 मध्ये महाराष्ट्रीयन परंपरेनुसार लग्न केलं. यानंतर या जोडप्यानं ख्रिश्चन परंपरेनुसारदेखील लग्न केलं. जेनेलिया-रितेशला रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत.

हेही वाचा :

  1. 'या राक्षसाला कठोर शिक्षेची गरज' रितेश देशमुखनं बदलापूर प्रकरणी मांडलं मत - badlapur case
  2. रितेश देशमुखनं त्याच्या लेडी लव्ह जेनेलियाला मजेदार व्हिडिओ शेअर करून दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ - genelia deshmukh birthday
  3. मुसळधार पावसात फुटबॉल खेळताहेत रितेश-जेनेलियाची मुलं, जेनेलिया म्हणते, 'रोखणं अशक्य आहे' - Genelia kids playing footbal

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.