ETV Bharat / entertainment

'हे' पाच भयपट आणि वेब सीरीज पाहून तुम्हीही व्हाल थक्क... - five horror movies and web series - FIVE HORROR MOVIES AND WEB SERIES

Horror movies and web series : बॉलिवूडमधील असे पाच हॉरर चित्रपट आणि वेब सीरीज आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का पोहचू शकतो. हे काही चित्रपट आणि वेब सीरीज आहेत ज्या शक्यतो कधीही एकट्यानं पाहू नयेत.

Horror movies and web series
हॉरर चित्रपट (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 10:35 AM IST

मुंबई - Horror movies and web series : हॉरर चित्रपट आणि वेब सीरीज अनेकजण पाहातात. अनेकदा असं होतं की, एखादी सीरीज किंवा चित्रपट पाहिल्यानंतर झोप लागत नाही. काही काही चित्रपट आणि वेब सीरीज इतक्या भयावह असतात की तुम्ही एकट्यात पाहू शकत नाही. काही चित्रपट आणि वेब सीरीजच्या कथा सत्या गोष्टींवर आधारित असतात तर काही काल्पनिक. आज आम्ही तुम्हाला अशाच काहीबद्दल मालिका आणि चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही एकट्यानं पाहू शकणार नाहीत, जर पाहिल्यास तुमची झोप उडून जाऊ शकते.

घोल : राधिका आपटे, मानव कौल आणि रोहित पाठक अभिनीत 'घोल' 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. ही वेब सीरीज खूप थरारक आहे. 'घोल' नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता. राधिका आपटे आणि मानव कौल यांच्याशिवाय महेश बलराज आणि रत्नावली भट्टाचार्जी यांसारख्या दिग्गज कलाकार देखील या सीरीजमध्ये दिसले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

वीराना : 'वीराना' हा बॉलिवूडमधील सर्वात भयानक चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 1988 मध्ये रिलीज झाला होता. श्याम रामसे आणि तुलसी रामसे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जास्मिनची मुख्य भूमिका होती. याव्यतिरिक्त राजेश विवेक उपाध्याय, साहिला चड्ढा, हेमंत बिरजे, कुलभूषण खरबंदा आणि गुलशन ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.

भूत : 'भूत' हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं. 'भूत' चित्रपटात अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट तुम्ही अमेजॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

1920 : '1920' हा चित्रपट विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. 2008 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये अदा शर्मा आणि रजनीश दुग्गल मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट अमेजॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

द कान्जरिंग : हा हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे येतील. 'द कॉन्ज्युरिंग-2' हा हॉरर चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा चित्रपट एकट्यानं पाहू नये.

हेही वाचा :

  1. कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी ग्लॅमरस स्टाईलमध्ये अवतरली ऐश्वर्या राय - CANNES FILM FESTIVAL 2024
  2. उर्वशी रौतेलाचा सिंड्रेला बनत लाल गाऊनसह कान्स 2024 मध्ये दबदबा - CANNES FILM FESTIVAL 2024
  3. कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी ग्लॅमरस स्टाईलमध्ये अवतरली ऐश्वर्या राय - CANNES FILM FESTIVAL 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.