मुंबई -TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम गुरुचरण सिंग, ज्यानं रोशन सिंग सोढी यांची भूमिका केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला बेपत्ता झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. यानंतर तो सुखरुप आपल्या घरी पोहचला होता. मात्र त्याला शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी खूप प्रयत्न केला होता. आता तो प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसला आहे. शनिवारी, 6 जुलै रोजी रात्री तो आपल्या पाळीव श्वानबरोबर मुंबई विमानतळावर दिसला. दरम्यान 'तारक मेहता का उल्टा चष्मा' टीआरपीच्या यादीत हा खूप पुढे होता. मात्र या शोमधील काही कलाकारांनी सोडून दिले. आता या मालिकेत पुन्हा एकदा गुरुचरण सिंग एंट्री करणार असल्याचं समजत आहे.
गुरुचरण सिंगची शोमध्ये होईल एंट्री : इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, गुरुचरण सिंग या वर्षाच्या सुरुवातीला अचानक बेपत्ता झाल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी अनेक प्रयत्न शोधण्यासाठी केले होते. तो 25 दिवसांनंतर घरी परत आला होता. दरम्यान तो मुंबईत परतल्यानं खूश असल्याचा दिसला. व्हिडिओमध्ये गुरुचरणला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनी त्याची थक बाकी दिली असल्याचं त्यानं सांगितलं. यावेळी त्याला काही प्रश्न विचारले असता यावर त्यानं म्हटलं, "हो जवळजवळ पैसे सर्वांचे दिले आहेत, मात्र त्याला इतरांबद्दल मला माहित नाही. मागे गुरुचरण सिंगनं शो सोडल्याची चर्चा होत्या.
गुरुचरण सिंग झाला बेपत्ता : गुरुचरण सिंग 22 एप्रिल 2024 रोजी बेपत्ता झाल्यानंतर तो 18 मे रोजी त्याच्या दिल्ली परतला. तो घरी परतल्यानंतर लगेचच दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली, त्यानंतर त्यानं धार्मिक सहलीला जाण्यासाठी घरातून निघाल्याचं उघड केलं होतं. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरुचरण बेपत्ता झाल्यापासून अमृतसर आणि लुधियानासारख्या अनेक शहरांतील गुरुद्वारांना भेट देत होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावेळी गुरुचरणला अनेक कॉल करण्यात आले होते, मात्र त्याचा फोन हा लागत नव्हता.