ETV Bharat / entertainment

टायगर श्रॉफच्या परफॉर्मन्सनं वुमन्स प्रीमियर लीग २०२४ च्या प्रेक्षकांना घातली भुरळ - Tiger Shroff performance

Tiger Shroff performance : वुमन्स प्रीमियर लीग २०२४ चा रंगारंग उद्घाटन सोहळा बंगळूरुतील एम चिन्नास्वामी मैदानात पार पडला. यावेळी टायर श्रॉफच्या जबरदस्त परफॉर्मन्सनं उपस्थित प्रेक्षकांना मोहित केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Tiger Shroff
टायगर श्रॉफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 6:13 PM IST

मुंबई Tiger Shroff performance : क्रिकेटकडं एक धर्म म्हणून पाहलं जाते. क्रिकेटची लोकप्रियता अफाट असून महिला क्रिकेटकडंही प्रेक्षक आकृष्ट होताना दिसताहेत. इंडियन प्रीमियर लीग ही पुरुष क्रिकेट स्पर्धा उत्तुंग शिखरावर असताना गेल्या दोनेक वर्षांपासून महिलांची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेतही चुरस निर्माण झाल्याचं दिसत असून तिलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. यावर्षीही या स्पर्धेची सुरुवात दिमाखात झाली. या भव्य उद्घाटन सोहळ्यात अभिनेता टायगर श्रॉफच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मोहीत केलं.

प्रेक्षकांचा, खास करुन तरुण वर्गाचा, लाडका असलेला टायगर श्रॉफ एक युथ आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. बॉलीवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफनं आपल्या दमदार परफॉर्मन्सनं प्रेक्षकांच्या हृदयावर आपली छाप सोडली. द टायगर श्रॉफ इफेक्टनं त्याची असलेली अनोखी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली. टायगर हा त्याच्या चित्रपटांतील भूमिकांच्या बरोबरीनंच एक उत्तम डान्सर म्हणून ओळखला जातो. वुमन्स प्रीमियर लीग २०२४ च्या ओपनिंगला त्यानं डोळ्याचं पारणं फेडणारा परफॉर्मन्स देत सोहळ्याला चार चाँद लावले आणि प्रेक्षकांनी द टायगर श्रॉफ इफेक्टचा रोमांचक अनुभवला घेतला.

टायगरचा अक्षय कुमार सोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' प्रदर्शनाच्या मार्गावर असून टायगर लवकरच 'सिंघम अगेन'मध्येही ॲक्शन करताना दिसणार आहे. या समारंभाच्या आयोजकांचा आणि उपस्थित प्रेक्षकांचा ऋणी असल्याचं त्यानं बोलून दाखवलं. टायगर व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि शाहिद कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनीही आपापल्या लोकप्रिय गाण्यांवर त्यांच्या परफॉर्मन्सनं प्रेक्षकांना खुश केलं. वुमन्स प्रीमियर लीग २०२४ उद्घाटन सोहळा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुपरस्टार शाहरुख खाननं केलं. यावेळी शाहरुखनंही आपली जादू त्याच्या डान्स परफॉर्मन्समधून दाखवून दिली. या स्पर्धेतील सर्व कर्णधारांना त्यानं मंचावर आमंत्रीत केलं आणि त्यांच्यासह त्याची सिग्नेचर पोज देऊन परदेशी पाहुण्यांनाही खूश करुन सोडलं. मंचावरील त्याचा हा फोटो कालच्या दिवसाचं आकर्षण ठरला होता.

हेही वाचा -

  1. खुशी कपूरने श्रीदेवीची सहावी पुण्यतिथी एका हृदयस्पर्शी आठवणीसह केली साजरी
  2. कथित लव्हबर्ड्स रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची आशिष रेड्डीच्या रिसेप्शनला स्टाईलमध्ये एन्ट्री
  3. शाहरुखची कन्या सुहाना खानने अलिबागमध्ये खरेदी केली ९.५ कोटी रुपयांची जमीन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.