ETV Bharat / entertainment

निम्रत कौरनं बनवला हा खास प्रसाद... करीना, अक्षयसह या सेलिब्रिटींनी दिल्या गुरुपर्वाच्या शुभेच्छा - CELEBRITIES WISHED GURU PARVA

आज पार पडत असलेल्या गुरुपर्वाच्या निमित्तानं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, निम्रत कौरने प्रसादाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

CELEBRITIES WISHED GURU PARVA
सेलिब्रिटींनी दिल्या गुरुपर्वाच्या शुभेच्छा ((IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 15, 2024, 3:52 PM IST

मुंबई - गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्तानं गुरुपर्व उत्सव साजरा केला जातो. यानिमित्तान बॉलिवूड सेलेब्रिटीजपैकी अक्षय कुमार, करीना कपूर, रकुल प्रीत सिंग आणि दिलजीत दोसांझसह अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना गुरुपूरानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. निम्रत कौरने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती गुरुपर्वाच्या शुभ मुहूर्तावर कडा प्रसाद बनवताना दिसत आहे.

akshaykumar Instagram
सेलिब्रिटींनी दिल्या गुरुपर्वाच्या शुभेच्छा ((@akshaykumar Instagram))

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर चाहत्यांना शुभेच्छा देताना, करीना कपूरनं इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली, 'गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा' अस कॅप्शन तिनं दिलंय. या प्रसंगी अक्षय कुमारनेही चाहत्यांना या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

(@kareenakapoorkhan Instagram)
सेलिब्रिटींनी दिल्या गुरुपर्वाच्या शुभेच्छा (@kareenakapoorkhan Instagram)

निम्रत कौरने गुरुपर्वावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती कडा प्रसाद बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये निम्रतनं खुलासा केला आहे की तिनं तिच्या आईकडून हलवा बनवण्याची कला शिकली आहे.

क्लिपमध्ये कौर म्हणाली, 'घर तेच असंत जिथं खीर बनते. प्रत्येक गुरुपर्वाला मी घरी हलवा बनवते, याला गुरुद्वारामध्ये कडा प्रसाद म्हणतात. माझे आजोबा पण हलवा बनवायचे. ते अनेक वर्षे गुरुद्वारामध्ये हलवा बनवत असत. माझी आई त्यांच्याकडून शिकली आणि मी माझ्या आईकडून शिकले. तर, चला ते बनवूया. मी साखरेचा पाक बनवून सुरुवात करेन. असं म्हणत हा व्हिडिओ शेअर करताना निम्रतनं कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'घरी बनवलेला हलवा, गुरु पर्वच्या लाख लाख शुभेच्छा'.

रकुल प्रीतने इन्स्टाग्रामवर स्वतः आणि पती जॅकी भगनानीबरोबरची एक क्लिप पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टला 'सतगुर नानक परगटिया, माती धुंद जग चनन होया, धन धन गुरु नानक देव जी महाराज दे प्रकाश पूरब दी आप सरियां संगतन नू लाख लाख वादियां' असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये रकुल हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे.

याशिवाय सनी देओल, पती राघव चड्ढासोबत परिणीती चोप्रा, पंजाबी गायक दिलजीत दोसांझ, जास्मिन भसीन यांच्यासह अनेक स्टार्सनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.