ETV Bharat / entertainment

'गूगल आई'चा रहस्यभेद करणाऱ्या ट्रेलरला प्रेक्षकांनी उचलून धरले, पाहा थक्क करणारा ट्रेलर - Google Aai Trailer - GOOGLE AAI TRAILER

Google Aa Trailer : नव्या विषयाची हाताळणी मराठी चित्रपटातून नेहमी होत असते. आजच्या वाढत्या तंत्रज्ञान वापराचा विषय घेऊन 'गूगल आई' हा रसहस्यमय थरारक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 4:59 PM IST

मुंबई - Google Aa Trailer : सध्या मनुष्याच्या आयुष्यात टेक्नॉलॉजीचा प्रभाव वाढत चालला आहे. सर्च मशीन गूगलचे महत्व सर्वांनाच परिचित आहे. या सर्वांचा परिणाम सिनेमावरदेखील झालेला दिसतो. आगामी मराठी चित्रपट 'गूगल आई' या नावावरून त्याचा प्रत्यय येईल. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा 'गूगल आई'चा थरारक आणि विविध भावना उलगडणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'गूगल आई'च्या रहस्यांची उकल कशी व कधी होईल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'गूगल आई' चित्रपटाच्या रोमांचक आणि मनोवेधक ट्रेलरला नेटिझन्स चांगला प्रतिसाद देत आहेत.

डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी यांच्या प्रस्तुत 'गूगल आई' या चित्रपटाचे निर्माते डॉलर दिवाकर रेड्डी आहेत. गोविंद वराह यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. एस सागर यांनी संगीत दिले आहे. यात प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी आणि माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका हसत्या खेळत्या आनंदी कुटुंबावर अचानक एक मोठे संकट येते. या संकटामुळे त्या कुटुंबाची वाताहत होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातून ते कसे बाहेर पडतात आणि त्यासाठी त्यांना 'गूगल आई'ची कशी मदत होते हे चित्रपटातून समोर येईल.

Google Aa Trailer
गूगल आई ट्रेलर लॉन्च (Etv Bharat)

या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील दिग्दर्शकाने केल्यामुळे यात दाक्षिणात्य चित्रपटांतील छाप बघायला मिळेल. दिग्दर्शक गोविंद वराह म्हणाले की, "बऱ्याच काळापासून मला मराठी चित्रपटसृष्टीत मला काम करायचे होते. 'गूगल आई'मुळे ते स्वप्न पूर्ण झाले. 'गूगल आई'ला दक्षिणी शैलीचा स्पर्श देण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या वापराचा फायदा आणि तोटा दोन्ही आहेत. त्याचा योग्य वापर कसा करावा हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून यात थरार आणि रहस्य देखील पाहाता येईल."

Google Aa Trailer
गूगल आई ट्रेलर लॉन्च (Etv Bharat)

'गूगल आई' हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.